जानेवारी १६
जानेवारी १६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १६ वा किंवा लीप वर्षात १६ वा दिवस असतो.
ठळक घटना
- २७ - रोमन सेनेटने ऑक्टाव्हियस सीझरला ऑगस्टस ही पदवी बहाल केली.
दहावे शतक
- ९२९ - कोर्दोबाच्या अब्द अर् रहमान तिसऱ्याने स्वतःला खलिफा जाहीर केले. कोर्दोबाच्या खिलाफतीची ही सुरुवात होय.
सोळावे शतक
- १५४७ - ईव्हान द टेरिबल(भयंकर ईव्हान) रशियाच्या झारपदी.
- १५५६ - फिलिप दुसरा स्पेनच्या राजेपदी.
- १५८१ - इंग्लंडच्या संसदेने रोमन कॅथोलिक धर्माला बेकायदा जाहीर केले.
सतरावे शतक
- १६०५ - मिगेल सर्व्हान्तेसचे एल इन्जिनियोसो हिदाल्गो डॉन किहोते दीला मान्चा(डॉन किहोतेचे पहिले पुस्तक) प्रकाशित. पुढे याचे इंग्लिशमध्ये ऍड्व्हेन्चर्स ऑफ डॉन क्विक्झोट नावाने भाषांतर झाले.
- १६८१ - छत्रपती संभाजी राजे यांचा राज्याभिषेक झाला.
अठरावे शतक
- १७६१ - ब्रिटिश सैन्याने पॉॅंडिचेरी फ्रांसकडून जिंकले.
- १७८० - अमेरिकन क्रांती - केप सेंट व्हिन्सेन्टची लढाई.
विसावे शतक
- १९०९ - अर्नेस्ट शॅकल्टनच्या संघाने चुंबकीय दक्षिण ध्रुव शोधला.
- १९१७ - पहिले महायुद्ध - जर्मन परराष्ट्रसचिव आर्थर झिमरमनने मेक्सिकोला अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारण्यासाठी तार पाठवली.
- १९१९ - अमेरिकेचे संविधान सुधारून संपूर्ण राष्ट्रात दारूबंदी जाहीर करण्यात आली.
- १९५५ - नॅशनल डिफेन्स अकॅडमी इमारतीचे मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते उदघाट्न.
- १९७८ - भारतातील १,००० रुपये आणि अधिक किमतीच्या नोटा चलनातून रद्द केल्या गेल्या.
- १९७९ - ईराणच्या शहा मोहम्मद रझा पेहलवीने कुटुंबासहित इजिप्तला पळ काढला.
- १९९२ - एल साल्व्हाडोर सरकार व क्रांतिकारकांनी मेक्सिको सिटीत चापुल्तेपेकचा तह मान्य केला व १२ वर्षे चाललेले गृहयुद्ध संपवले.
- १९९५ - आयएनएस विद्युत या संपूर्ण देशी बनावटीच्या क्षेपणास्त्र नौकेचे गोवा येथे जलावतरण.
- १९९६ - भारतीय कापड गिरणी कामगार नेता दत्ता सामंतची हत्या.
- १९९६ - पुण्याचे शिल्पकार दिनकर शंकरराव थोपटे यांची ललित कला अकादमीच्या पुरस्कारासाठी निवड
- १९९८ - उर्दू कवी व लेखक अली सरदार जाफरी यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
एकविसावे शतक
- २००१ - कॉॅंगोचा अध्यक्ष लॉरें-डेझरे कबिलाची त्याच्याच अंगरक्षकाकडून हत्या.
- २००२ - संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने एकमताने ओसामा बिन लादेन व ईतर तालिबान विरुद्ध ठराव संमत केला.
- २००३ - स्पेस शटल कोलंबिया अंतराळात. १६ दिवसानंतर परतताना अपघातात सर्व अंतराळवीरांचा मृत्यू.
- २००५ - ६६ वर्षांच्या एड्रियाना ईलेस्कुने मुलीला जन्म दिला व आत्तापर्यंतची सर्वात जास्त वयाची माता ठरली.
- २००६ - एलेन जॉन्सन-सर्लिफ लायबेरियाच्या अध्यक्षपदी. सर्वात प्रथम आफ्रिकन महिला राष्ट्राध्यक्ष.
- २००८ - टाटा मोटर्सच्या नॅनो या एक लाख रुपये किंमतीच्या 'पीपल्स कार'चे अनावरण
जन्म
- १४०९ - रेने पहिला, नेपल्सचा राजा.
- १४७७ - योहान्स शोनर, जर्मन अंतराळतज्ञ व नकाशेतज्ञ.
- १८५३ - आंद्रे मिशेलिन, फ्रेंच उद्योगपती.
- १८५५ - अलेक्झांडर वेब, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८७६ - क्लॉड बकेनहॅम, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९११ - इव्हान बॅरो, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९१९ - सैयद अब्दुल मलिक, असमिया साहित्यिक.
- १९२० - वै वै, चिनी भाषेमधील कवी, लेखक, पत्रकार.
- १९२० - नानाभॉय अर्देशीर ऊर्फ नानी पालखीवाला, भारतीय कायदेपंडित आणि अर्थतज्ञ
- १९२६ - ओंकार प्रसाद तथा ओ.पी.नय्यर, भारतीय संगीतकार.
- १९३१ - योहान्स रौ, जर्मन राष्ट्राध्यक्ष.
- १९४६ - कबीर बेदी, भारतीय अभिनेता.
- १९५२ - फुआद दुसरा, इजिप्तचा राजा.
- १९५६ - वेन डॅनियल्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९७१ - हामिश ॲंथोनी, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- १७१० - हिगाशीयामा, जपानी सम्राट.
- १९०१ - महादेव गोविंद रानडे, भारतीय समाजसुधारक, धर्मसुधारक, न्यायाधीश, अर्थशास्त्रज्ञ.
- १९१९ - फ्रान्सिस्को दि पॉला रॉद्रिगेझ अल्वेस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
- १९३८ - शरत् चंद्र चतर्जी, बांगला साहित्यिक, स्वातंत्र्यसैनिक.
- १९५४ - बाबूराव पेंटर, भारतीय चित्रपटनिर्माता, चित्रकार, शिल्पकार.
- १९५७ - आर्तुरो तोस्कानिनि, इटालियन संगीतकार.
- १९६६ - साधू वासवानी, भारतीय आध्यात्मिक गुरू.
- १९८८ - लक्ष्मीकांत झा, भारतीय अर्थशास्त्रज्ञ.
- १९९७ - डॉ. दत्ता सामंत, मुंबईतील कामगार नेते.
- २००० - त्रिलोकीनाथ कौल, रशिया, अमेरिका व इराणमधील भारताचे राजदूत
- २००१ - पंडितराव बोरस्ते, भारतीय क्रीडा संघटक, शिवछत्रपती पुरस्कार विजेता.
- २००३ - रामविलास जगन्नाथ राठी, भारतीय उद्योगपती.
- २००५ - श्रीकृष्ण हरी मेहेंदळे, मराठी संगीतकार. पेटीवाले मेहेंदळे म्हणून ख्याती.
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर जानेवारी १६ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जानेवारी १४ - जानेवारी १५ - जानेवारी १६ - जानेवारी १७ - जानेवारी १८ - (जानेवारी महिना)