जानेवारी १२
जानेवारी १२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १२ वा किंवा लीप वर्षात १२ वा दिवस असतो.
ठळक घटना
सोळावे शतक
- १५२८ - गुस्ताव पहिला स्वीडनच्या राजेपदी.
अठरावे शतक
- १७०५ - मराठा साम्राज्याची राजधानी सातारा येथे हलविण्यात आली.
एकोणिसावे शतक
विसावे शतक
- १९०८ - पहिला लांब अंतरावर पाठवला गेलेला रेडियो संदेश आयफेल टॉवरवरून प्रसारित झाला.
- १९१५ - महिलांना मतदानाचा अधिकार देण्याचा प्रस्ताव अमेरिकन संसदेने फेटाळला.
- १९२६ - पाश्चर संस्थेने धर्नुवातासाठी लस शोधल्याची घोषणा केली.
- १९३१ - सोलापूरचे क्रांतिकारी किसन सारडा, मल्लाप्पा धनशेट्टी व कुरबन हुसेन साचा:जगन्नाथ शिंदेयांना येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली.
- १९३६ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतराची घोषणा केली.
- १९९७ - सामाजिक कार्यकर्त्या गंगुताई पटवर्धन यांना महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा पहिला बाया कर्वे पुरस्कार प्रदान.
- १९९८ - एकोणीस युरोपीय देशांनी मानवी क्लोनिंगवर बंदी आणली.
एकविसावे शतक
- २००५ - राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना.
- २००६ - हज यात्रेच्या अखेरच्या दिवशी मक्केजवळ मीना येथे प्रतीकात्मक दगड फेकण्याचा विधी चालू असताना झालेल्या चेंगराचेंगरीत ३४५ मुस्लिम भाविकांचा मृत्यू व २९० जखमी.
- २०१० - हैतीमध्ये झालेल्या भूकंपात ३,००,००० पेक्षा अधिक मृत्यू.
जन्म
- १५९८ - जिजाबाई, छत्रपती शिवाजीच्या आई.
- १८५४ - व्यंकटेश बापूजी केतकर, गणिती व ज्योतिर्विद.
- १८६३ - भारतीय तत्त्वज्ञानाची महती जगभर पसरवणारे नरेन्द्रनाथ दत्त उर्फ स्वामी विवेकानंद, भारतीय तत्त्वज्ञ.
- १८९२ - मिखाइल गुरेविच, रशियन विमान तंत्रज्ञ.
- १८९३ - हर्मन गोरिंग, नाझी अधिकारी.
- १८९३ - आल्फ्रेड रोझेनबर्ग, नाझी अधिकारी.
- १८९९ - पॉल हर्मन म्युलर, नोबेल पारितोषिक विजेता स्विस रसायनशास्त्रज्ञ.
- १९०२ - सौद, सौदी अरेबियाचा राजा.
- १९०२ - धुंडिराजशास्त्री विनोद, भारतीय तत्त्वज्ञ, स्वातंत्र्य सैनिक आणि लेखक.
- १९०६ - महादेवशास्त्री जोशी, भारतीय संस्कृतीिोशाचे व्यासंगी संपादक.
- १९१८ - सी.रामचंद्र, ज्येष्ठ संगीतकार.
- १९१६ - पीटर विलेम बोथा, दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष.
- १९१७ - महाऋषी महेश योगी, भारतीय तत्त्वज्ञ.
- १९४० - डिक मोत्झ, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९४९ - हारुकी मुराकामी, जपानी साहित्यिक, अनुवादक.
- १९६२ - रिची रिचर्डसन, वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू.
- १९७२ - पॉल विल्सन, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
- १९७६ - गॅव्हिन रेनी, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- १५१९ - मॅक्सिमिलियन पहिला, पवित्र रोमन सम्राट.
- १८३४ - विल्यम विंड्हॅम ग्रेनव्हिल, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १८९७ - सर आयझॅक पिटमॅन, शॉर्टहॅंड लघुलिपीचे जनक.
- १९४४ - वासुकाका जोशी, लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी व चित्रशाळेचे विश्वस्त.
- १९६६ - नरहर विष्णू तथा काकासाहेब गाडगीळ, स्वातंत्र्यसैनिक, लेखक, वक्ते, राजकीय नेते, केंद्रीय मंत्री आणि पंजाबचे राज्यपाल.
- १९७६ - अगाथा क्रिस्टी, इंग्लिशरहस्यकथा लेखिका.यांनी लिहिलेल्या माऊस ट्रॅप या नाटकाचा प्रयोग आजही लंडन येथील नाट्यगृहा मध्ये रोज एक तरी प्रयोग सादर केला जातो
- १९९२ - पंडित कुमार गंधर्व, हिंदुस्थानी संगीताच्या क्षेत्रातील ख्यातनाम गायक.शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ ’ कुमार गंधर्व’
- १९९७ - ओ.पी. रल्हन, हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक व अभिनेते.
- २००५ - अमरीश पुरी, भारतीय अभिनेता.– आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त केलेले चित्रपट व रंगमंच कलाकार
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर जानेवारी १२ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जानेवारी १० - जानेवारी ११ - जानेवारी १२ - जानेवारी १३ - जानेवारी १४ - (जानेवारी महिना)