जागृती (वृत्तपत्र)
जागृत हे वृत्तपत्र हे सत्यशोधक समाजाचा पुरस्कार करणारे होते. त्याची सुरुवात १९१७ साली सुरू झाली आणि त्याचे संपादक भगवंत बळवंत पाळेकर त्यांचे मुळ आडनाव आहेर होते. जागृती हे पत्र बडोद्याहून प्रसिद्ध होत असे. तरी स्थानिक प्रश्नाबरोबर महाराष्ट्रातील घडमोडीवरही लक्ष ठेवून होते.
इतिहास
जागरूक पत्र निघाले त्याच सुमारास सत्यशोधक समाजाचा पुरस्कार करणारे पण काहीसे स्वतत्र बाण्याचे असे एक मराठी साप्ताहिक गुजरातीभाषी बडोदे शहरात सुरू झाले. भगवंत बळवंत पाळेकर यांनी जागृती पत्र स्वताच्या हिमतीवर सुरू केले वा सुमारे ३२ वर्ष ते मोठ्या चिकाटीने स्वसामर्थ्यावर चालविले. जागृती पत्राचे सर्वसाधारण धोरण सत्यशोधक मताचे असली तरी त्यात एकांतिकता नसे. १९१८ च्या राजकीय सुधारणा जाहीर झाल्या त्यावेळी मराठी व इतर मागासलेल्या जातीच्या नावावर कित्येकांनी जो खेळखंडोबा चालविला होता. त्याला जागृती या पत्राने विरोध केला. जागृतीने राष्ट्रीय धोरणांचा पुरस्कार केला. पत्राच्या अशा धोरणामुळे त्यांच्याविषयी समाजात गैरसमज पसरविण्याचे प्रयत्नही झाले. त्या प्रयत्नांना १९ मार्च १९१८ च्या अंकात सडेतोड उत्तर देण्यात आली.
पहिले अंक
पहिला अंक गुरुवार २५ ऑक्टोबर १९१७ रोजी दुसऱ्या मुहूर्तावर प्रसिद्ध झाला. पुढे दर शनिवारी पत्र प्रसिद्ध होऊ लागले.
पहिले संपादकीय मंडळ
भगवंत बळवंत पाळेकर हे सुरुवातीपासून त्या पत्राचे संपादक राहिले आहे.
संदर्भ
- ^ लेले, रा. के. (तृतीय आवृत्ती २००९). मराठी वृत्तपत्रांचा इतिहास. पुणे: कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे ३०, प्रकाशन क्रमांक ९६४.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)