जागृती (चित्रपट)
१९५४मधील हिंदी चित्रपट | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
गट-प्रकार |
| ||
मूळ देश | |||
संगीतकार | |||
पटकथा |
| ||
निर्माता |
| ||
दिग्दर्शक |
| ||
प्रमुख कलाकार |
| ||
प्रकाशन तारीख |
| ||
कालावधी |
| ||
| |||
जागृती हा सत्येन बोस दिग्दर्शित १९५४चा बॉलिवूड चित्रपट आहे. हा १९४९ च्या बंगाली चित्रपट परिबर्तन वर आधारित होता जो बोस यांनीच दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात राजकुमार गुप्ता, अभि भट्टाचार्य आणि रतन कुमार मुख्य भूमिकेत आहेत. १९५६ मध्ये ३र्या फिल्मफेर अवॉर्ड्समध्ये या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा फिल्मफेर पुरस्कार मिळाला होता आणि आपल्या अभिनयाबद्दल भट्टाचार्य यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेर पुरस्कार मिळाला होता.
हा चित्रपट १५ ऑगस्ट २०१६ रोजी भारतीय चित्रपट महोत्सव संचालनालय आणि संरक्षण मंत्रालयाने संयुक्तपणे सादर केलेल्या स्वातंत्र्यदिनी फिल्म फेस्टिव्हलमध्ये ७० वा भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून प्रदर्शीत केले गेला.[१]
कथानक
हा चित्रपट एका वाया गेलेल्या श्रीमंत मुलाबद्दल आहे, अजय (राजकुमार गुप्ता) ज्याला त्याचे काका बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवतात. बोर्डिंग स्कूल ही शेखर (अभि भट्टाचार्य) चालवितो, जो विद्यार्थ्यांमध्ये अपारंपरिक अध्यापन पद्धतींचा उपयोग करून चांगल्या मूल्ये रुजविण्याचा प्रयत्न करतो. तो विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवतो आणि त्यांना त्यांच्या देशाच्या वारसाबद्दल प्रशिक्षण देतो आणि त्यांना आदर्श नागरिक होण्यासाठी प्रोत्साहित करतो. बोर्डिंग स्कूलमध्ये पण अजय आपले वाममार्ग सुरू ठेवतो आणि शेखरसह अनेक वेळा अडचणीत सापडतो. दरम्यान, अजय हा शक्ती (रतन कुमार) नावाच्या एका अपंग मुलाशी मैत्री करतो, ज्याचे पात्र अजयच्या विरुद्ध आहे; एक कर्तव्यदक्ष आणि आज्ञाधारक असे. शक्ती अजयचे मार्ग बदलण्यात मदत करण्यासाठी खूप प्रयत्न करतो, पण अजयचा हट्टी स्वभाव वाटेत येतो.
शेवटी, एक दिवस अजय शाळेतून पळण्याचा प्रयत्न करतो आणि शक्तीला ते समजते. शक्ती त्याच्या मागे जाऊन त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो, परंतु अपंगत्वामुळे ते जमत नाही. अजयला परत आणण्याच्या तळमळीत रस्त्यावरील एक जड वाहन त्याला चिरडून ठार मारते. अजयचा हा परिवर्तनीय क्षण होतो कारण त्याला समजते की शक्ती आपल्या जिद्दीमुळे मरण पावला. यामुळे तो बदलून आणि एक चांगली व्यक्ती बनण्यास प्रवृत्त होतो. तो शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट होतो. दरम्यान, शेखर यांच्या अध्यापनाच्या पद्धतीला शिक्षण मंडळाची मान्यता मिळते. तो आपल्या अपारंपरिक परंतु यशस्वी मार्ग इतरत्र पोहोचविण्यासाठी बोर्डिंग स्कूल सोडतो.
संगीत
हा चित्रपट आपल्या देशभक्तीपर गाण्यांसाठी ओळखला जातो. या काळातील सर्वश्रेष्ठ असे कवी प्रदीप यांनी लिहिलेले हे गीत हेमंतकुमार यांनी संगीत दिले आहेत. काही प्रसिद्ध गाणे आहेत: "आओ बच्चों तुम्हें दिखाये" आणि "दे दी हमें अजादी (साबरमती के संत)".
चित्रपट बेदारी
बेदारी या पाकिस्तानी चित्रपटाचे यासारखेच कथानक होते आणि काही शब्द बदलून गाणी आणि संगीत थेट जागृती चित्रपटातून घेण्यात आले होते. रतन कुमार, जे आपल्या परिवारासह पाकिस्तानला गेले होता, त्याने बेदारी मध्येही अभिनय केला.[२] १९५६ मध्ये पाकिस्तानमध्ये बेदारी प्रकाशीत झाला तेव्हा प्रदर्शनाच्या पहिल्या काही आठवड्यात त्याने कमालीचा व्यवसाय केला. तथापि, ते पाकिस्तानी जनतेस समजले की हा एक चोरी केलेला चित्रपट आहे. पाकिस्तानच्या सेन्सॉर बोर्डाने त्वरित या चित्रपटावर बंदी आणली.[३]
संदर्भ
- ^ http://dff.nic.in/70thIndependance_Day/70_Saal_Independance_Day.pdf
- ^ Nandini Chandra, Meerit and Opportunity in the Child-centric Nationalistic films of the 1950s, Narratives of Indian Cinema, Manju Jain, Primus Books, 2009, p. 123-144
- ^ https://www.dawn.com/news/1217564Paying plagiarised tribute to Quaid Sayed GB Shah Bokhari (Ex-Member Censor Board), on Dawn.com