Jump to content

जागतिक सायकल दिन

युक्रेन येथील विश्व सायकल दिवस

विश्व सायकल दिवस हा एक जागतिक दिवस आहे. दुचाकी सायकल ही वापरण्यास आणि विकत घेण्यास सोपी आणि स्वस्त असा वाहन पर्याय आहे. त्यामुळे सर्वाँना सामावून घेणारे जागतिक स्तरावरील वाहन म्हणून सायकल कदे पाहणे याबद्दल हा दिवस साजरा करण्याचे ठरविले गेले. एप्रिल २०१८ मध्ये संयुक्त राष्ट्र समितीने ३ जून हा दिवस विश्व सायकल दिवस म्हणून निश्चित केला.[]

महत्व

समाजतील कोणत्याही स्तरातील व्यक्तींना सायकल चालविण्याचा आनंद घेता यावा यासाठी या दिवशी विशेष सायकल यात्रा आयोजित केल्या जातात. सायकल हे वाहन सहिष्णुता, मानवता यांचे प्रतीक आहे असा संदेश यातून पोहोचविण्याचा प्रयत्न केला जातो. आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी सायकल चालविणे उपयुक्त आहे असा संदेश यानिमित्ताने दिला जातो. यासाठी विविध उपक्रम आयोजित केले जातात.[]

इतिहास

२०१५ साली लेझेक सिबिस्की या समाजिक शास्त्र विषयाच्या प्राध्यापकांनी सर्वांसाठी सायकल याविषयी लेख लिहिला. त्यानंतर जाणीव जागृती होऊन सायकल विषयासाठी विशेष दिवस राखून ठेवणे याला महत्व मिळाले.[]

पर्यावरण महत्व

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री विश्व सायकल दिवस निमित्ताने भाषण करताना ३ जून २०१८

सायकल हे निर्धुर बाहन असल्याने त्यामुळे हवेचे प्रदूषण होत नाही. जागतिक स्तरावरील पर्यावरण प्रश्न वाढता असल्याने सायकल चालवून हवेहे प्रदूषण कमी करण्याचा जागतिक पातळीवरील महत्वाचा संदेश या दिवशी दिला जातो.[]

संदर्भ

  1. ^ Nations, United. "World Bicycle Day". United Nations (इंग्रजी भाषेत). 2022-06-25 रोजी पाहिले.
  2. ^ "World Bicycle Day 2022: 'जागतिक सायकल दिन' का साजरा केला जातो? काय आहे यामागचा इतिहास, महत्त्व आणि यावर्षीची थीम? जाणून घ्या | 🙏🏻 LatestLY मराठी". LatestLY मराठी. 2022-06-02. 2022-06-25 रोजी पाहिले.
  3. ^ "World Bicycle Day - June 3". National Today (इंग्रजी भाषेत). 2021-06-03. 2022-06-25 रोजी पाहिले.
  4. ^ "World Bicycle Day 2022: History, significance and quotes to share on the occasion". Firstpost (इंग्रजी भाषेत). 2022-06-03. 2022-06-25 रोजी पाहिले.