जागतिक मराठी परिषद
स्थापना
जागतिक मराठी परिषदेची स्थापना १९८९ साली झाली.
संस्थापक
भा.कृ देसाई, मनोहर जोशी, माधव गडकरी आणि शरद पवार.
उद्देश
जागतिक पातळीवर मराठी भाषकांना एकत्र आणावे, मराठी भाषा व संस्कृती यांची जपणूक करून ती वृद्धिंगत करावी, उद्योगात मराठी माणसाची प्रगती होण्यासाठी त्याला उद्युक्त करावे आणि या सर्व संदर्भात विचारांची देव-घेव व्हावी या उद्देशाने जागतिक मराठी परिषदेची स्थापना झाली.
अधिवेशने
- १९८९ - मुंबई (अध्यक्ष वि.वा. शिरवाडकर
- १९९१ - मॉरिशस (अध्यक्ष पु.ल. देशपांडे)
- १९९४ - दिल्ली (अध्यक्ष वसंत गोवारीकर)
- १९९६ - जेरुसलेम, इस्रायल (अध्यक्ष प्रभाकर देवधर)
- १९९९ - हैदराबाद (अध्यक्ष रघुनाथ माशेलकर)
जागतिक मराठीपरिषदेची एक शाखा म्हणून १९९४ साली जागतिक मराठी अकादमीची स्थापना झाली. या नव्या संस्थेने २००४ सालापासून ‘शोध मराठी मनाचा’ या नावाची संमेलने घेण्यास सुरुवात केली.
हे सुद्धा पहा
- मराठी साहित्य संमेलने
- अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन