जागतिक बौद्ध धम्म परिषद (छत्रपती संभाजीनगर)
जागतिक बौद्ध धम्म परिषद (इतर नावे: जागतिक धम्म परिषद, आंतरराष्ट्रीय धम्म परिषद, आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद) ही भगवान बुद्धांच्या विवेक, करुणा आणि शांती या उपदेशांचा प्रसार करण्याच्या उदात्त कारणांसह २२ ते २४ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत औरंगाबाद येथे झालेली एक आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद आहे. ही तीन दिवसीय परिषद औरंगाबाद येथील नागसेनवन परिसरातील पी.इ.एस. महाविद्यालयाच्या प्राणांगणात झाली. ही परिषद रत्नदिप कांबळे यांनी भरवली होती. अखिल भारतीय भिक्खू संघटनेच्या मार्गदर्शनाखाली हे आयोजन औरंगाबाद या महाराष्ट्रातील ऐतिहासिक शहरात करण्यात आले. चौदावे दलाई लामा तसेच डॉ. वारकगोडा धम्मसिद्धि श्री पज्ञानंद ज्ञानरथनबिधान, श्रीलंका देशातील महानायक थेरो आणि भारत व इतर सुमारे १५ देशांतील ज्येष्ठ भिक्खू यांच्या उपस्थितीने ही परिषद संपन्न झाली. परिषदेत लक्षावधी बौद्ध उपासक-उपासिका सहभागी झाल्या होत्या.[१][२][३][४]
संदर्भ
- ^ "Global Buddhist Congregation". gbcindia2019.in. 2019-11-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-11-22 रोजी पाहिले.
- ^ "औरंगाबादेत भरणार जागतिक बौद्ध धम्म परिषद; दलाई लामांची उपस्थिती". Lokmat. 21 नोव्हें, 2019.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "जागतिक बौद्ध धम्म परिषदेची तयारी जोरात : Video | eSakal". www.esakal.com.
- ^ "औरंगाबाद येथे जागतिक बौद्ध धम्म परिषदेचे उद्घाटन | eSakal". www.esakal.com. 2020-02-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-11-22 रोजी पाहिले.