Jump to content

जागतिक जल दिन

केन्यामधील जागतिक जल दिन (२०१०)

जागतिक जल दिन' हा एक आंतरराष्टीय दिवस आहे.प्रतिवर्षी २२ मार्च रोजी हा दिवस साजरा करण्यात येतो.[]स्वच्छ आणि ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांची काळजी घेणे व त्यांच्या शाश्वत संरक्षणासाठी कार्यरत राहणे याचा संदेश देणे यासाठी या दिवसाची योजना केली गेली आहे.

आयोजक

UN (Water) म्हणजेच युनायटेड नेशन (वाॅटर) ही संस्था या दिवसाचे आयोजन करते.स्वच्छता आणि पाणी या दोन विषयांवर ही संस्था प्रामुख्याने काम करते.१९९३साली प्रथम जागतिक जल दिन साजरा करण्यात आला.

संकल्पनाधारित उपक्रम

प्रतिवर्षी संयुक्त राष्टाचे सदस्य असलेल्या देशांकडून हा दिवस साजरा केला जातो.त्यासाठी प्रतिवर्षी एक नवी संकल्पना मांडली जाते.त्या संकल्पनेला अनुसरून वर्षभर उपक्रम राबवले जातात.उदा.पाणी आणि ऊर्जा,पाणी आणि शाश्वत विकास इ.[]

संदर्भ

  1. ^ a b "World Water Day 22March".