Jump to content

जांभवडे

  ?जांभवडे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरकुडाळ
जिल्हासिंधुदुर्ग जिल्हा
भाषामराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
• आरटीओ कोड

• एमएच/

जांभवडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील एक गाव आहे. घोडगे, भरणी, सोनवडे, आणी कुपवडे सोबत जांभवडे अशी पंचक्रोशी मधील आकार मानाने मोठा गाव तसेच गावच्या आई भगवती देवीच्या आशीर्वादाने या गावातील लोक आनंदाने जीवन जगता आहेत. गावामध्ये प्रवेश करताच ग्रामदेवता देवी भगवती आई च सुंदर अस मंदिर पाहताक्षणी सगळा थकवा क्षणात नाहीसा होतो आणी जणू एकादी दैविक शक्ती सभोवताली वावरत असल्याचा भास होतो असेच वाटते. 84 खेड्यांची मालकीण आणी तळकोकणातील लोकांचे श्रद्धास्थान अशी या देवी आई ची ओळख. वार्षिक जत्रोत्सव प्रमाणे इतरही दिवशी दर्शनासाठी गर्दी पाहवयास मिळते. नवसाला पावणारी आणी हाकेला धावणारी देवी भगवती आई च्या दर्शनाला दूरवरून लोक येत असतात. गाव जरी मोठा असला तरी आता तरुणांच्या पुढाकाराने आणी सहकार्याने विविध उपक्रम आणी योजनाच्या माध्यमातून लोकोपयुक्त सोईसुवधा करण्यात आलेल्या आहेत. अलीकडील काळामध्ये पथदिवे लावण्यात आले असून वाडी वस्त्यामध्ये रस्त्याची सोय केली आहे. तसेच पंतप्रधान जलजीवन योजनेंतर्गत घराघरामध्ये पाण्याची सोय केली गेली आहे. पंतप्रधान आवास योजनेतून गावामध्ये पक्क्या स्वरूपाची घरे बांधून देण्यात आली आहेत. गावामध्ये न्यू शिवाजी हायस्कुल नावाची शैक्षणिक संस्था असून गेली अनेक वर्षापासुन न्यानदानाचे काम अखंडरित्या चालू आहे. तसेच जानकी क्लिनिक प्राथमिक आरोग्य उपचार केंद्र असून सोबतच अजून 2-3 सुशृषा केंद्र सेवा देत आहेत. शेती हा प्रमुख व्यवसाय असल्यामुळे येथील लोक अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहेत. अलीकडील काळामध्ये दुग्ध व्यवसायाकडे लोकांचा कल वाढलेला आहे. इतरही पूरक संसाधने आणी सोईमुळे रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. परोपकारी वृत्ती आणी सहकार्यपूर्ण वातावरण यामुळे येथील लोक मिळून मिसळून आणी गुण्या गोविंदाणे राहतात... कणकवली पासून 22-25 किमी च्या अंतरावर असणाऱ्या भगवती देवी आई च्या छत्रछायेखाली आनंदित राहणाऱ्या जांभवडे गावाला एकदा आवश्या भेट द्या.

भौगोलिक स्थान

हवामान

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते.

लोकजीवन

प्रेक्षणीय स्थळे

नागरी सुविधा

जवळपासची गावे

संदर्भ

१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/