जांभळा सूर्यपक्षी
शास्त्रीय नाव | Nectarinia asiatica, Cinnyris asiaticus |
---|---|
कुळ | शिंजिराद्य (Nectariniidae) |
अन्य भाषांतील नावे | |
इंग्लिश | Purple Sunbird |
संस्कृत | पुष्पंधय |
हिंदी | फुलचूही |
आकारमान
जांभळा सूर्यपक्षी (किंवा फूलचुखी) हा अंदाजे १० सें.मी. मापाचा, चिमणीपेक्षा लहान पक्षी असून विणेच्या हंगामात नर चमकदार निळ्या-जांभळ्या रंगाचा असतो. याच्या पिसाच्या वरच्या भागात शेंदरी रंगाचा एक छोटा पट्टा असतो. इतर काळात नर-मादी दिसायला सारखेच असतात. वरून तपकिरी रंग, खालून फिकट पिवळा, काळे पंख, छातीवर काळा पट्टा.
वास्तव्य
जांभळा सूर्यपक्षी संपूर्ण भारतभर आढळतो. शिवाय बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान, ब्रह्मदेश या देशांतही याचे वास्तव्य आहे.
प्रजाती
रंग आणि आकारमानावरून याच्या किमान तीन उपजाती आढळतात.
आढळस्थान
पानगळीचे जंगल, शेतीचा प्रदेश, माळराने (२४०० मीटर उंच दक्षिण आशिया आणि श्रीलंका मध्ये), हिमालय (१७०० मीटर उंच), बागा इ. ठिकाणी जांभळा सूर्यपक्षी हमखास दिसून येतो.
प्रजनन काळ
साधारणपणे मार्च ते मे हा यांचा वीण हंगाम काळ असतो, यांचे घरटे लांबट थैलीसारखे, झाडाला किंवा एखाद्या घराच्या आधाराने लटकणारे असते. घरटे, गवत, कोळ्याचे जाळे, लाकडाचे छोटे तुकडे यांचे बनलेले असते. मादी एकावेळी २ ते ३ अंडी देते; ही अंडी राखाडी-हिरवट रंगाची व त्यावर तपकिरी ठिपके असतात. मादी एकटीच घरटे बांधण्याचे, अंडी उबविण्याचे काम करते मात्र पिलांना खाऊ घालण्याचे काम नर-मादी मिळून करतात.
चित्रदालन
- वीण हंगामातील नर
- अल्पवयीन जांभळा सूर्यपक्षी
- वीण हंगामातील नर
- वीण हंगाम नसतानाचा नर
- मादी