जांब त्रिपुटी
जांब त्रिपुटी हे गाव सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यामध्ये आहे. हे गाव जरंडेश्वरच्या पायथ्याला वसलेले आहे.जरंडेश्वर या सुप्रसिद्ध डोंगरामुळे या गावाची महती वाढली आहे.जरंडेश्वर हा डोंगर रामायण काळापासून प्रसिद्ध आहे. हनुमानाने रामासाठी संजीवनी आणताना डोंगराचा पडलेला एक भाग म्हणजे हा जरंडेश्वर होय.श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी लाखो भाविक हनुमानाच्या दर्शनासाठी जरंडेश्वरला येतात. येथे हनुमानाचे भव्य मंदिर आहे.