जवाहरलाल नेहरू बंदर
जवाहरलाल नेहरू बंदर(जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जे एन पी टी)) किंवा न्हावा शेवा हे आधुनिक सुविधा असलेले बंदर मुंबईच्या उत्तरेला ठाण्याच्या खाडीवर भारतातील सगळ्यात मोठे कंटेनर-बंदर आहे. हे न्हावा आणि शेवा या बेटांवर सन १९८९मध्ये बांधून पूर्ण झाले. मुंबई बंदराद्वारे होणारी मालवाहतूक कमी करण्यासाठी हे बांधण्यात आले. २०१४-१५ साली न्हावा शेवा बंदरातून ४४ लाख ७० हजार कंटेनर्सची ने-आण झाली.
न्हावा शेवा हे बंदर जगातील प्रमुख ३५ कंटेनर बंदरापैकी एक आहे. हा पोर्ट नॅशनल हायवे ३४८ द्वारे रस्ते मार्गे तर पनवेल-न्हावा शेवा रेल्वे लाईन ने जोडला आहे. हा भारतातील कंटेनर हाताळणीत दुसऱ्या क्रमांकावर आहे हे बंदर उरण तालुक्यातील न्हावा शेवा या गावामध्ये वसवलेला आहे, जे मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात व नवी मुंबईत येते. अनेक कंपन्यांचे वीअर हाऊस आहेत व जेएनपीटी टाऊनशिप येथे आहेत.