जवारी गाय
जवारी (कन्नड:ಜವಾರಿ) हा एक शुद्ध भारतीय गोवंश असून हा उत्तर कर्नाटक मधील हैद्राबाद कर्नाटक (आत्ताचे नाव कल्याण कर्नाटक) तसेच हुबळी, विजापूर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात आढळतो.[१]
हा गोवंशन स्थानिक पातळीवर प्रसिद्ध असल्यामुळे कल्याण-कर्नाटक प्रांतात याची संख्या कमी जास्त दीड ते दोन लाख पर्यंत आहे.
शारीरिक रचना
हा आकाराने मध्यम आणि काटक बांध्याचा गोवंश आहे. चेहरा मध्यम, सरळ आणि मजबूत जबडा असून याचे कान सुद्धा लहान आणि टोकदार असतात. शिंगांचा आकार मध्यम असून पाठीमागे वळलेले असतात. पायांचा आकार मध्यम आणि काटक असतो. या गोवंशाचा रंग गडद लाल, काळा, तपकिरी किंवा मिश्र असतो.[१]
वैशिष्ट्य
मध्यम प्रकृती, काटक शरीर, शांत आणि लाजाळू स्वभाव असे याचे वैशिष्ट्य आहे. स्थानिक वातावरणात मिसळलेला, चांगली रोगप्रतिकारक शक्ती यामुळे हा गोवंश फारसा आजाराला बळी पडत नाही.
हा गोवंश राष्ट्रीय डेरी विकास बोर्ड (NDDB) कडे नोंदणीकृत नसला तरी स्थानिक पातळीवर दुहेरी हेतूचा गोवंश म्हणून मानल्या जातो.
भारतीय गायीच्या इतर प्रजाती
भारतीय गायीच्या इतर प्रजातींची माहिती मिळवण्यासाठी येथे टिचकी द्या ― भारतीय गायीच्या विविध जाती