Jump to content

जलसार

  ?जलसार

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ.९०८५७ चौ. किमी
जवळचे शहरपालघर
जिल्हापालघर जिल्हा
लोकसंख्या
घनता
२,१५३ (२०११)
• २,३७०/किमी
भाषामराठी
सरपंचश्री. गणेश भोईर
बोलीभाषा
कोड
पिन कोड
दूरध्वनी
• आरटीओ कोड

• ४०११०२
• +०२५२५
• एमएच४८


जलसार हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

सफाळे रेल्वे स्थानकापासून पश्चिमेला मांडे मार्गाने गेल्यावर मिठागर गावानंतर हे गाव लागते. सफाळेपासून हे गाव ७.७ किमी अंतरावर आहे.

हवामान

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

शेकाट्या/शेकोट्या/शेकाटया हा स्थलांतरित पक्षी पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यात माकुणसार, केळवे, माहीम, खारेकुरण,जलसार येथील मिठागरात हल्ली दिसू लागला आहे.[]

लोकजीवन

हे मध्यम आकाराचे मोठे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ५१५ कुटुंबे राहतात. एकूण २१५३ लोकसंख्येपैकी १११८ पुरुष तर १०३५ महिला आहेत. गावाची साक्षरता ८२.४८ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८९.७७ आहे तर स्त्री साक्षरता ७४.६२ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २३० आहे. ती एकूण लोकसंख्येच्या १०.६८ टक्के आहे.

नागरी सुविधा

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस सफाळे रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. ऑटोरिक्षा सुद्धा सफाळेवरून उपलब्ध असतात.

जवळपासची गावे

कांद्रेभुरे, मिठागर, बंदर, कोरे, खर्डी, टेंभीखोडावे, वाढीवसरावली, वेढी, नवघर, उंबरवाडा तर्फे मनोर, खारवडश्री ही जवळपासची गावे आहेत.जलसार ग्रामपंचायतीमध्ये जलसार, खारमेंडी आणि खारवडश्री ही गावे येतात.

संदर्भ

1. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html 2. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html

३.

http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc

  1. ^ #महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, मंगळवार दिनांक १ आगस्ट २०२३