Jump to content

जलपरी

जलपरी हा लोकसाहित्यामध्ये आढळणारा एक विशिष्ट काल्पनिक प्राणी आहे. जलपरीचे वरचे अर्धे शरीर हे मानव स्त्रीचे असते व उरलेले कंबरेपासून खालचे शरीर हे मासळीचे असते. जलपरी पाण्यात अथवा काही काळ जमिनीवर ही राहू शकते. सुंदर स्त्रीला उपमा देण्याकरता अनेकदा हा शब्द वापरला जातो. अगदी पुरातन काळापासून वेगवेगळ्या सभ्यतांमध्ये जलपरीचा उल्लेख आढळतो.

मराठीमध्ये लहान मुलांच्या कथांमध्ये हे पात्र मोठ्या प्रमाणात वापरण्यात आलेले दिसते. जलपरी हे काल्पनिक पात्र वापरून विविध भाषांमध्ये बरेचसे चित्रपटही बनले आहेत.