जल विद्युत निर्मिती
पाण्यापासुन विजनिर्मिती करण्यासाठी प्रथम धरण बांधून पाण्याचा साठा केला जातो. या साठलेल्या पाण्यात स्थितीज उर्जा असते.धरणातील पाणी जास्त उंचीवरून कमी उंचीवर येताना स्थितीज उर्जेचे गतीज उर्जेत रूपांतर होते. याच गतीज उर्जेचा वापर टर्बाईन्स फिरवन्यासाठी केला जातो.टर्बाईन्स जनित्राला जोडलेली असतात.या जनित्रांद्वारे विजनिर्मिती केली जाते.