जयश्री बापट
जयश्री बापट या एक मराठी लेखिका व कवयित्री आहेत.
पुस्तके
- आजीची गाणी गाऊ रंगवायची मजा घेऊ (बालसाहित्य)
- आनंदयात्री (आत्मकथन)
- इल्तिजा (मराठी/हिंदी कवितासंग्रह)
- Grandmas Nursery Rhymes (इंग्रजी)
- जीवनसंगीत (कथासंग्रह)
- तरंग (कवितासंग्रह)
- दीपशिखा : अजरामर स्त्रियांचे गौरवगान (व्यक्तिचित्रण)
- रेशीमलडी (कवितासंग्रह)
- शब्दांच्या पाकोळ्या (कवितासंग्रह)
पुरस्कार
- साहित्य गौरव संस्थेतर्फे कॅन्सरशी झगडणाऱ्या जयश्री बापट यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (१-९-२०१७ची बातमी)
- ‘दीपशिखा’ पुस्तकाला अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे ग.ह. पाटील पुरस्कार
- पळसे ग्रामविकास मंडळ संचलित सार्वजनिक वाचनालय आणि नाशिक ग्रामीण साहित्य चळवळ यांच्या वतीने ‘जीवनसंगीत’ पुस्तकासाठी यशवंत पोरजे कथासंग्रह पुरस्कार.