Jump to content

जयश्री तळपदे

जयश्री टी.
जन्मजयश्री चित्रसेन तळपदे
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय (चित्रपट)
भाषामराठी,
हिंदी (चित्रपट)
वडील चित्रसेन तळपदे

जयश्री तळपदे ऊर्फ जयश्री टी. (जन्मदिनांक अज्ञात - हयात) ही हिंदी चित्रपटांतून अभिनय करणारी मराठी अभिनेत्री व नर्तकी आहे.

इ.स. १९६० च्या दशकात सहायक अभिनेत्री/ विनोदी व्यक्तिरेखेच्या भूमिकांमार्फत जयश्रीने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. काही बिगबजेट चित्रपटांतील गाण्यांवर तिने केलेली नृत्येही लोकप्रिय ठरली. उदाहरणार्थ, शर्मिली (इ.स. १९७१) चित्रपटातील रेशमी उजाला है, मैं सुंदर हूं (इ.स. १९७१) चित्रपटातील नाच मेरी जान फटाफट, तराना (इ.स. १९७९) चित्रपटातील सुलताना सुलताना या गाण्यांवरील नृत्यांनी तिला ख्याती मिळवून दिली.

अभिनेता चित्रसेन तळपदे हे तिचे वडील. तर हिंदी चित्रपटांतील अभिनेत्री मीना टी., ऊर्फ मीना तळपदे ही तिची बहीण आहे[].

चित्रपट कारकीर्द

चित्रपटवर्षभाषासहभाग
चंदा और बिजलीइ.स. १९७०हिंदीअभिनय
आफतइ.स. १९७७हिंदीअभिनय
मोर्चाइ.स. १९८०हिंदीअभिनय
गोष्ट धमाल नाम्याचीइ.स. १९८४मराठीअभिनय
एक चिट्ठी प्यार भरीइ.स. १९८५हिंदीअभिनय
बड़े घर की बेटीइ.स. १९८९हिंदीअभिनय
काला कोटइ.स. १९९३हिंदीअभिनय
हम साथ साथ हैइ.स. १९९९हिंदीअभिनय
ये रस्ते है प्यार केइ.स. २००१हिंदीअभिनय
चलते चलतेइ.स. २००३हिंदीअभिनय
मेरी बिवी का जवाब नाहीइ.स. २००४हिंदीअभिनय

संदर्भ

  1. ^ पाध्ये, अनिता. "माइलस्टोन - आठवणीतली मीना टी". 2010-12-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १९ ऑक्टोबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे