Jump to content

जयश्री गडकर

जयश्री गडकर
जन्ममार्च २१, १९४२
कणसगिरी, कारवार जिल्हा (आत्ताचा उत्तर कन्नड जिल्हा), कर्नाटक, भारत
मृत्यू २९ ऑगस्ट, २००८ (वय ६६)
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र मराठी नाटक
मराठी चित्रपट
बॉलीवूड
मराठी दूरचित्रवाणी मालिका
हिंदी दूरचित्रवाणी मालिका
भाषामराठी, हिंदी
प्रमुख चित्रपट साधी माणसं
सवाल माझा ऐका!
प्रमुख टीव्ही कार्यक्रम महाभारत
पतीबाळ धुरी

जयश्री गडकर (मार्च २१, १९४२ - ऑगस्ट २९, २००८) या मराठी चित्रपटांतील अभिनेत्री होत्या.

जीवन

जयश्री गडकरांचा जन्म मार्च २१, १९४२ रोजी कणसगिरी, कारवार जिल्ह्यात (आताचा उत्तर कन्नड जिल्हा) झाला.
१९५६ मध्ये वयाच्या चौदाव्या वर्षी दिसतं तसं नसतं या चित्रपटाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण झाले.
त्यांचे ऑगस्ट २९, २००८ रोजी मुंबईत हृदयविकाराने निधन झाले.

चित्रपट

चित्रपट वर्ष (इ.स.) भाषा सहभाग
अशी असावी सासूमराठीनिर्मिती, कथालेखन, दिग्दर्शन
एक गाव बारा भानगडीमराठीअभिनय
दिसतं तसं नसतं१९५६मराठीअभिनय
मोहित्यांची मंजुळामराठीअभिनय
वैजयंतामराठीअभिनय
वैशाखवणवामराठीअभिनय
सवाल माझा ऐकामराठीअभिनय
सांगत्ये ऐकामराठीअभिनय
अवघाचि संसार मराठी अभिनय
बाप  माझा  ब्रह्मचारी मराठी अभिनय
मोहित्यांची  मंजुळा मराठी अभिनय
साधी  माणसं मराठी अभिनय
कडकलक्ष्मी मराठी अभिनय
मल्हारी  मार्तंड मराठी अभिनय
 एक  गाव  बारा  भानगडी  मराठी अभिनय
आई   कुना  म्हणू  मी मराठी अभिनय
पाटलाची  सून मराठी अभिनय
सून  लाडकी  या  घरची  मराठी अभिनय
 जिव्हाळा मराठी अभिनय
साधी मानस मराठी अभिनय

जयश्री गडकर : एक अविस्मरणीय प्रवास

जयश्री गडकर यांचे पती बाळ धुरी आणि चिरंजीव अविनाश आणि विश्वजीत धुरी ह्यांनी जयश्री गडकरांच्या जीवनप्रवासावर वरील नावाचा एक कार्यक्रम बनवला आहे. त्यात मधुरा दातार आणि प्रशांत नासेरी काम करीत असून तुषार दळवी आणि दीप्ती भागवत यांचे सूत्रसंचालन आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ १७ जानेवारी २०१७ रोजी झाला.

पुरस्कार

जयश्री गडकर यांना मानिनी, वैंजयंता, सवाल माझा ऐका व साधी माणसं या चित्रपटांसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत.[].

संदर्भ

  1. ^ "संग्रहित प्रत". 2009-12-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-07-01 रोजी पाहिले.

बाह्य दुवे