जयवर्मन चौथा
जयवर्मन दुसरा (ख्मेर: ជ័យវរ្ម័នទី៤) हा ख्मेर राजवंशाचा सातवा सम्राट होता. जयवर्मन इ.स. ९२८ ते इ.स. ९४१पर्यंत सत्तेवर होता.
हा पहिल्या इन्द्रवर्मनचा नातू होता. महेन्द्रादेवीचा मुलगा असलेल्या जयवर्मनने यशोवर्मन पहिल्याच्या सावत्रबहिणीशी म्हणजेच आपल्या आत्याशीच लग्न केले होते.
याला परमशिवपाद असेही म्हणले जाते.
ईशानवर्मन आणि त्याचा मोठा भाऊ हर्षवर्मन यांच्या राज्यकालात जयवर्मनने त्यांच्याशी केलेल्या चढाओढीमुळे त्यांच्या संपूर्ण राज्यकाळात ख्मेरमध्ये शांतता नव्हती. हर्षवर्मनच्या मृत्यूपश्चात ईशानवर्मनने जयवर्मनचा पराजय करून त्यास ख्मेरमधून घालवून दिले.[१] ईशानवर्मनच्या मृत्यूनंतर जयवर्मनने सत्ता हस्तगत केली.
जयवर्मनच्या मृत्यूनंतर दुसरा हर्षवर्मन सम्राटपदी आला.[२]
संदर्भ आणि नोंदी
मागील दुसरा ईशानवर्मन | ख्मेर राजवंश इ.स. ९२८-इ.स. ९४१ | पुढील दुसरा हर्षवर्मन |