Jump to content

जयंत साळगांवकर

जयंत शिवराम साळगांवकर
जन्म जयंत साळगांवकर
फेब्रुवारी १, इ.स. १९२९
मालवण, सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र
मृत्यू २० ऑगस्ट, इ.स. २०१३ []
मुंबई, महाराष्ट्र
निवासस्थान मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्वमराठी, भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण मॅट्रिक, संस्कृतचे पारंपरिक शिक्षण, ज्योतिषशास्त्राचे शिक्षण
पेशा ज्योतिषगणन, साहित्य
प्रसिद्ध कामे कालनिर्णय दिनदर्शिका (स्थापना)
धर्महिंदू
वडील शिवराम साळगांवकर

जयंत शिवराम साळगांवकर (जन्म : मालवण, सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र, १ फेब्रुवारी १९२९; - [२० ऑगस्ट २०१३) हे मराठी ज्योतिषतज्ज्ञ, लेखक, पत्रकार व उद्योजक होते. हे कालनिर्णय'' या सुमारे नऊ भाषांतून निघणाऱ्या आणि केवळ मराठी भाषेतच ४८ लाख प्रतींचा खप असलेल्या वार्षिक दिनदर्शिकेचे (कॅलेंडर) संस्थापक-संपादक होते. ही दिनदर्शिका आणि पंचांग इ.स. १९७३ पासून प्रकाशित होत आले आहे.

शिक्षण आणि बालपण

शिक्षण : मॉट्रिकपर्यंत संस्कृतचे पारंपरिक शिक्षण.

कुटुंब

जयंत साळगावकर यांच्या पत्‍नी जयश्री साळगावकर पाककलेत निपुण असून त्या लोकसत्तेमध्ये लाडूच लाडू नावाचे सदर लिहीत. हे सदर अतिशय लोकप्रिय झाले होते. या सदरातील लेखांचे संकलन करून लाडूच लाडू या नावाचे पुस्तक लंडनहून प्रकाशित झाले आहे.

कारकीर्द

सार्वजनिक क्षेत्र

  • श्री सिद्धिविनायक मंदिर, मुंबई ह्या संस्थेचे माजी ट्रस्टी.
  • आयुर्विद्यावर्धिनी ह्या आयुर्वेदिक संशोधन करणाऱ्या ट्रस्टचे माजी अध्यक्ष.
  • मुंबई मराठी साहित्य संघ ह्या संस्थेचे अध्यक्ष.
  • श्रीगणेश महानिधी ह्या पत्रकारिता, सैनिकी शिक्षण आणि रंगभूमी ह्या क्षेत्रांत महत्त्वाचे काम करणाऱ्या ट्रस्टचे संस्थापक, अध्यक्ष.
  • श्रीगणेश विद्यानिधी (पुणे) ह्या शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या ट्रस्टचे अध्यक्ष.
  • महाराष्ट्र गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष.
  • इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष.
  • दादर-माटुंगा कल्चरल सेंटर संस्थेचे विश्वस्त.
  • महाराष्ट्र व्यापारी मित्रमंडळाचे अध्यक्ष.
  • १९८३ अखिल भारतीय ज्योतिष संमेलनाचे अध्यक्ष.
  • मुंबई येथे झालेल्या ७४ व्या नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष.
  • सातारा जिह्यातील विटा येथे झालेल्य विसाव्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष .
  • श्रीक्षेत्र पंढरपूर येथे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी यांनी बांधलेल्या श्रीज्ञानेश्वर मंदिराचे सन्माननीय उद्घाटक.
  • कोल्हापूर येथे २९-३० एप्रिल इ.स. १९९१ रोजी झालेल्या आठव्या मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष होते.
  • मुंबईत झालेल्या अखिल महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे स्वागताध्यक्ष.
  • श्रीसमर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्या विद्यमाने आणि गुरुकुल प्रतिष्ठान पुणे यांच्या सहकार्याने सातारा येथे झालेल्या संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.
  • मुंबई मराठी पत्रकार संघाचे सन्माननीय सदस्य
  • आणखी कितीतरी ट्रस्टवर आणि सेवाभावी सार्वजनिक संस्थांमध्ये पदाधिकारी.

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशक / प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.) टिप्पणी
सुंदरमठकादंबरीसमर्थ रामदासस्वामींच्या जीवनावरील कादंबरी
देवा तूचि गणेशुश्रीगणेश ह्या दैवताचा इतिहास, स्वरूप, प्रसार याबद्दल
धर्म-शास्त्रीय निर्णयग्रंथाचे संपादन व लेखन
देवाचिये द्वारीलेखसंग्रहधार्मिक, पारमार्थिक अशा स्वरूपाचे लिखाण संतवाङमयाच्या आधाराने इ.स. १९९५ मध्ये दै. लोकसत्तात प्रकाशित झालेल्या ३०९ लेखांचा संग्रह
सुंदर ते ध्यान (देवाचिये द्वारी भाग-२)लेखसंग्रहइ.स. १९९६ मध्ये दैनिक लोकसत्तात ‘देवाचिये द्वारी’ ह्या सदरात प्रसिद्ध झालेल्या ३११ लेखांचा संग्रह
अमृताची खाणी (देवाचिये द्वारी भाग-३)लेखसंग्रहइ.स. १९९७ मध्ये दैनिक लोकसत्तात ‘देवाचिये द्वारी’ ह्या सदरात प्रसिद्ध झालेल्या ३१३ लेखांचा संग्रह
आनंदाचा कंद (देवाचिये द्वारी भाग-४)लेखसंग्रहइ.स. १९९८ मध्ये दैनिक लोकसत्तात ‘देवाचिये द्वारी’ ह्या सदरात प्रसिद्ध झालेल्या ३१३ लेखांचा संग्रह
ज्ञानाचा उद्गार (देवाचिये द्वारी भाग- ५)लेखसंग्रहइ.स. १९९९ मध्ये दैनिक लोकसत्तात ‘देवाचिये द्वारी’ ह्या सदरात प्रसिद्ध झालेल्या ३१३ लेखांचा संग्रह
दूर्वाक्षरांची जुडीलेखसंग्रह‘देवाचिये द्वारी’ इ.स. १९९५-१९९९ मधील श्रीगणेशावरील लेखांचे संकलन
गणाधीश जो ईशलेखसंग्रहश्रीगणेशावरील लेख व मुलाखती. वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालेल्या लेखांचा संग्रह
रस्त्यावरचे दिवेलेखसंग्रहआयुष्यात घडलेल्या, अनुभवाला आलेल्या, तसेच कोणाकडून तरी समजलेल्या प्रत्यक्ष घटनांवर आधारित साप्ताहिक ‘रविवारचा सकाळ’मध्ये प्रकाशित झालेल्या लेखांचा संग्रह
सगुण-निर्गुण दोन्ही समानलेखसंग्रहदैनिक महाराष्ट्र टाइम्समध्ये ‘सगुण-निर्गुण’या सदरातून इ.स. २००३-२००६ह्या दरम्यान प्रसिद्ध झालेल्या ११६ लेखांचा (संदर्भ टीपांसह) संग्रह
भाव तोचि भगवंतलेखसंग्रहदैनिक सकाळ (वृत्तपत्र)मध्ये ‘देवाचिये द्वारी’ ह्या सदरात इ.स. २००५-२००६ ह्या दरम्यान प्रसिद्ध झालेल्या १०८ लेखांचा संग्रह
  • दैनिक महाराष्ट्र टाइम्सच्या (ऑनलाइन आवृत्ती) ‘प्रातःस्मरण’ ह्या सदरात जानेवारी, इ.स. २००९ पासून साळगावकरांचे लेख प्रत्येक मंगळवारी प्रकाशित होत असत.

पुरस्कार व गौरव

  • ज्योतिर्भास्कर(संकेश्वर पीठाच्या शंकराचार्यांनी परीक्षा घेऊन दिलेली पदवी).
  • ज्योतिषालंकार (मुंबईच्या ज्योतिर्विद्यालयातर्फे दिलेली सन्मानदर्शक पदवी).
  • ज्योतिर्मार्तंड (पुण्याच्या ज्योतिष संमेलनात दिलेली सन्मानदर्शक पदवी).
  • महाराष्ट्र ज्योतिष विद्यापीठाने दिलेली विद्यावाचस्पती (डी.लिट्) ही बहुमानाची पदवी.
  • नाशिकच्या शिवपार्वती प्रतिष्ठानतर्फे ‘वैदिक पुरस्कार’ देऊन गौरव.
  • मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे उत्कृष्ट सदर लेखनाबद्दल ‘भ्रमंती पुरस्कार’.
  • कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे ‘जीवनगौरव पुरस्कार’.
  • छत्रपती शिवाजीमहाराज स्मारक समिती, मुंबई तर्फे‘जीवनगौरव पुरस्कार’.
  • महाराष्ट्र कला निकेतनतर्फे सांस्कृतिक कार्यासाठी ‘महाराष्ट्ररत्न’ पुरस्कार.
  • कृष्णमूर्ती ज्योतिष संशोधन मंडळ, मुंबई तर्फे ज्योतिष शास्त्राच्या विशेष सेवेप्रीत्यर्थ ‘ज्योतिक कौस्तुभ’पुरस्कार.
  • श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड, सातारा यांच्यातर्फे ‘समर्थ संत सेवा पुरस्कार’
  • रा.स्व.संघ जनकल्याण समिती (महाराष्ट्र प्रांत), पुणे यांच्या वतीने धर्मसंस्कृती क्षेत्रातील “परम पूजनीय श्रीगुरुजी पुरस्कार २०१०’.

https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0&action=edit&section=6

संकल्प

रुद्राक्ष माळा वाटण्याचा संकल्प

राष्ट्र आणि धर्म यांची उन्नती व्हावी, देशाची सर्व बाजूनी प्रगती व्हावी ह्यासाठी सर्वांच्या उपासनेला एकजुटीने आणि एकविचाराने बळ प्राप्त व्हावे, हिंदू संस्कृती समृद्ध व सशक्त व्हावी अशा हेतूने पंचप्रणवयुक्त गायत्रीचा जप जातीसाठी बंधने येऊ न देता सर्वांनी करावा, याकरिता साळगावकरांनी विनामूल्य रुद्राक्ष माळा वाटपाचा कार्यक्रम सुरू केला होता. या कार्यक्रमाद्वारे वीस हजाराहून अधिक माळांचे वाटप करण्यात आले.

निरुपण

काही वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या अल्फा टी.व्ही (मराठी)वर दिनांक २२ ऑगस्ट २००१ पासून ‘देवाचिये द्वारी’ ह्या संगीतमय कार्यक्रमात अभंग, गौळणी, पदे अशा संत रचनांवर आधारित असे प्रवचन होत असे. त्या कार्यक्रमात धर्म आणि चालीरीती विषयक शंकांचाही साळगावकरांनी परामर्श घेतला होता. त्यामुळे हा कार्यक्रम खूप लोकप्रिय झाला होता.

मृत्यू

ऑगस्ट, इ.स. २०१३मध्ये वृद्धापकालीन अस्वास्थ्यामुळे मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात साळगांवकरांना उपचारार्थ हलवण्यात आले. २० ऑगस्ट, इ.स. २०१३ रोजी भाप्रवेनुसार पहाटे ०५.१५ च्या सुमारास त्यांचे रुग्णालयातच निधन झाले []. []

संदर्भ व नोंदी

  1. ^ a b "काळनिर्णय.. : 'कालनिर्णय'चे संस्थापक, ज्योतिष जयंतराव साळगांवकर यांचे निधन". २४ ऑगस्ट, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "जयंत साळगांवकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार".

बाह्य दुवे