जय हेरंब (गीतसंग्रह)
जय हेरंब हा गणपतीच्या भक्तीगीतांचा संग्रह आहे. अजय जोगळेकर यांचे संगीतदिग्दर्शन असलेल्या या संग्रहात नऊ गाणी असून ती पंडित रघुनंदन पणशीकर, राहुल देशपांडे, माधुरी करमरकर व प्रिती ताम्हणकर यांनी गायली आहेत. एक दंत भालचंद्र, हेरंब गिरीजातनय जय, नमन तुझसी श्री गौरी सुता, जय देवा गणेशा ही त्यातील काही गाणी आहेत.