जम्मू
जम्मू | |
भारतामधील शहर | |
जम्मू येथील अमर महल राजवाडा | |
जम्मू | |
देश | भारत |
राज्य | जम्मू आणि काश्मीर |
जिल्हा | जम्मू जिल्हा |
समुद्रसपाटीपासुन उंची | १,०७३ फूट (३२७ मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | ५,०२,१९७ |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
जम्मू ही भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्याची हिवाळी राजधानी व जम्मू जिल्ह्याचे मुख्यालय आहे. जम्मू शहर दिल्लीच्या ६०० किमी उत्तरेस तावी नदीच्या काठावर वसले आहे. २०११ साली जम्मूची लोकसंख्या सुमारे ५ लाख होती.
दरवर्षी नोव्हेंबर ते एप्रिल ह्या हिवाळी महिन्यांदरम्यान जम्मू आणि काश्मीर राज्याचे सर्व कामकाज जम्मूमधून चालते व उर्वरित काळाकरिता राज्याची राजधानी श्रीनगरमध्ये असते. जम्मू रस्ते, रेल्वे व हवाई मार्गांद्वारे उर्वरित भारतासोबत जोडले गेले आहे. जम्मू तावी रेल्वे स्थानक हे भारतीय रेल्वेचे एक प्रमुख स्थानक असून येथून दिल्ली, मुंबई व कोलकातासह बहुतेक सर्व मोठ्या शहरांसाठी थेट सेवा उपलब्ध आहे. जम्मू–बारामुल्ला रेल्वेमार्ग बांधून पूर्ण झाल्यानंतर जम्मूहून श्रीनगरमार्गे थेट बारामुल्लापर्यंत रेल्वेसेवा शक्य होईल. राष्ट्रीय महामार्ग १ ए जम्मूला दिल्लीसोबत व काश्मीर खोऱ्यासोबत जोडतो. जम्मू विमानतळ शहराच्या मधोमध स्थित असून येथून रोज अनेक प्रवासी सेवा पुरवल्या जातात.
वैष्णोदेवी हे पवित्र हिंदू मंदिर जम्मूपासून ५० किमी अंतरावर स्थित आहे.