जमिनीतील प्रमुख घटक व त्यांची कार्ये
पिकांना वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्ये बहुतांशी जमिनीतून मिळतात. मात्र काही प्रमाणात पिकांची ही अन्नद्रव्यांची गरज रासायनिक खते, हिरवळीची खते, शेणखत, कंपोस्ट, पीक फेरपालटीत, शेंगवर्गीय पिकांचा समावेश इत्यादी प्रकारे भागविता येते. प्रमुख अन्नद्रव्यांचे जमिनीतील प्रमाण, स्वरूप, उपलब्धता व त्याचबरोबर रासायनिक खतांची वापरण्याची पद्धत, प्रमाण इत्यादींची शास्त्रीय माहिती असणे आवश्यक आहे. पिकांच्या योग्य वाढीसाठी एकंदर १६ 'विविध अन्नद्रव्यांची' गरज भासते. ही अन्नद्रव्ये म्हणजे दुय्यम अन्नद्रव्ये आणि सुक्ष्म अन्नद्रव्ये. यांपैकी प्रमुख तीन अन्नद्रव्यांविषयी आपण थोडे जास्त जाणून घेऊ.
नत्र(नायट्रोजन) - पिकातील नायट्रोजनच्या योग्य उपलब्धतेनुसार पिकातील हरितद्रव्यांचे प्रमाण वाढते. तसेच लूसलुसीत तजेलदार ठेवण्याचे काम नायट्रोजन करतो. तसेच नायट्रोजनमुळे पिकांची शाखीय वाढ मोठ्या प्रमाणात होते.
नत्र कमतरतेची लक्षणे -
पिकांची पाने पिवळी पडतात.
पिकांची वाढ खुंटते.
स्फुरद (फोस्फरस)-
- पिकातील यज्ञा फोस्फारसच्या उपलब्धतेमुळे पिकांच्या मुळांचीवाढ होते.
- पिकास फुटवे मोठ्या प्रमाणात फुटतात. त्याचबरोबर पिकाच्या खोडाला चांगली ताकद येते. त्यामुळे झाड पडत नाही किंवा कोलमडत नाही.
- नैसर्गिकरित्या फळे व्यवस्थित पिकण्यात मदत होते.
- पिकाची रोगरीत्या शक्ती वाढवून पिकाची मुळावरील डायझोबियमच्या गाठी वाढविण्यास मदत होते.
स्फूरद कमतरतेची लक्षणे -
पिकाच्या पानांना जांभळट रंग येतो.
पाने लांबट होऊन वाढ थांबते.
पालाश (पोटॅशिअम) -
- पिकातील पोटॅशियमच्या उपलब्धतेमुळेझाड सशक्त बनते.
- त्याचबरोबर झाडाची अन्न तयार करण्यासाठी क्षमता वाढते.
- पोटॅशियममुळे तृणधान्याच्या खोडाची ताकद वाढते त्याने ते जमिनीवर पडत नाही व झाड कोलमडत नाही.
पोटॅशियम कमतरतेचे लक्षणे -
पानाच्या कडा तांबडसर रंगाच्या होतात.
खोड आखूड होते व शेंडे गळतात.
अधिक माहिती - पिकाच्या वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्ये खालील प्रमाणे - मुख्य अन्नद्रव्य - नत्र, स्फुरद, पालाश. दुय्यम अन्नद्रव्य - कॅल्शियम, मॅग्रेशियम, सल्फर. सुक्ष्म अन्नद्रव्य - कार्बन डाय ऑक्साईड, हायड्रोजन, ऑक्सिजन, लोह, मॅगनीज, बोरॉन, झिंक, कॉपर, मॉलिब्लेनम, क्लोरीन ही अन्नद्रव्ये पिकांन हवा व पाण्यातून मिळतात.
संदर्भ
पुस्तक-शेती व पशुपालन