Jump to content

जपान एरलाइन्स

जपान एरलाइन्स
आय.ए.टी.ए.
JL
आय.सी.ए.ओ.
JAL
कॉलसाईन
JAPANAIR
स्थापना १ ऑगस्ट १९५१
हबहानेडा विमानतळ
नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ
मुख्य शहरेकन्साई आंतरराष्ट्रीय विमानतळ
नागोया
फुकुओका
नाहा
सप्पोरो
फ्रिक्वेंट फ्लायरजे.ए.एल. माइलेज बँक
अलायन्सवनवर्ल्ड
विमान संख्या १६३
गंतव्यस्थाने ९२
ब्रीदवाक्यFly into tomorrow
मुख्यालयतोक्यो
मॉस्कोच्या दोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळावर थांबलेले जपान एरलाइन्सचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान

जपान एरलाइन्स (जपानी: 日本航空) ही जपान देशामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान वाहतूक कंपनी (ऑल निप्पॉन एरवेझ खालोखाल) आहे. १९५१ साली स्थापन झालेली जपान एरलाइन्स १९५३ ते १९८७ दरम्यान जपानची राष्ट्रीय विमानकंपनी होती. १९८७ साली जपान एरलाइन्सचे पूर्णपणे खाजगीकरण करण्यात आले.

सध्या जपान एरलाइन्स प्रवासी सेवा पुरवणारी जगातील सहाव्या क्रमांकाची विमान कंपनी आहे. जपान एरलाइन्स ५९ देशांतर्गत तर ३३ आंतरराष्ट्रीय शहरांना विमानसेवा पुरवते.[]

ही जपानची ध्वजवाहक विमानकंपनी आहे व जपानमधील ऑल निप्पॉन एरवेझ नंतर दोन क्रमांकाची मोठी विमान कंपनी आहे.[] यांचे मुख्य कार्यालय जपानमधील तोक्यो मधील शिंनागवा येथे आहे. यांचे मुख्य केंद्र तोक्योचे नरीता आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि तोक्यो आंतरराष्ट्रीय विमानतळ (हनेदा) त्याचबरोबर ओसाका येथील कांसई आंतरराष्ट्रीय विमानतळ व इतामी येथील ओसाका आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत.

इतिहास

दुसरे जागतिक महायुद्ध झाल्यानंतर देशाचे प्रगतीच्या दृष्टीने दळणवळणाची निकड विचारात घेऊन जपान सरकारने खात्रीशीर वेगवान विमान दळणवळण व्यवस्था नजरेसमोर ठेवून जपान एर लाइन्स या विमान कंपनीची १ ऑगस्ट १९५१ रोजी स्थापना केली.[] यासाठी १० कोटी येन भागभांडवल गुंतविले होते. या कंपनीचे मुख्य कार्यालय जपानमधील चुओ, गिंजा येथे आहे. फिलिपिन एरलाइन्सचे डग्लस डीसी-३ किनसेई, हे विमान भाडेतत्त्वावर घेऊन २७ ते २९ ऑगस्ट दरम्यान एरलाइन सेवा चालू केली.

दुसऱ्या महायुद्धानंतर दि. २५ ऑक्टोबर रोजी खऱ्या अर्थाने जपानचे आंतरदेशीय विमान सेवेची सुरुवात झाले. मोकुसेई नाव दिलेल्या मार्टिनएर २०२ प्रकारच्या विमानाने उसन्या घेतलेल्या नॉर्थवेस्ट एरलाइन्सच्या वैमानिकाच्या मदतीने विमान आकाशात उड्डाण करून सेवेचे उद्‌घाटन केले.

दि.१ ऑगस्ट १९५३ रोजी जपानच्या राजकीय सभेत जपान एरलाइन्स विमान कंपनी कायदा मंजूर केला. १ ऑक्टोबर रोजी ही कंपनी जपानच्या सरकारने घेतलीआणि सर्व जबाबदाऱ्या आणि संपत्ती ही खाजगी पूर्वाधिकारात ठेवल्या. सन १९५३ मध्ये या जपान एरलाइन्स कंपनीने उत्तरेकडे तोक्यो ते सप्पोरो व मिसवा आणि दक्षिणेकडे नागोया, ओसाका, इवकुणी, फुकुओकापर्यंत आपली सेवा वाढविली.

दि.२ फेब्रुवारी १९५४ रोजी या विमान कंपनीने आपली आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू केली. डगलस DC- 6बी या विमानाने १८ प्रवासी तोक्यो येथून वके आयलंड आणि होनोलुलू मार्गे सॅ‌न्‍फ्रान्सिस्को येथे पोहचविले. या सुरुवातीच्या पहिल्या आणि दुसऱ्या आंतरराष्ट्रीय विमान सेवा उड्डाणांचे त्यांना अजूनही स्मरण होते.

ही पूर्वीची विमाने अमेरिकन वैमानिक चालवित आणि विमानांची देखभाल सन फ्रान्सिस्कोमध्ये युनायटेड एरलाइनकडे होते असी जाहिरात केली होती. जपान एरलाइन्स ने १९५५ मध्ये आपल्या स्थानिक सेवांचा सहभाग ठेवून ओकिनाव्हा मार्गे हॉंगकॉंगकडे उड्डाण केले. हा मार्ग सन १९५८ मध्ये बँकॉक व पुढे सिंगापूरपर्यंत वाढविला. सन १९५९ मध्ये DC-7Csचे मदतीने या कंपनीने सिॲटल आणि तोक्योपर्यंतची विनाथांबा सेवा दिली.[]

कंपनीचे कामकाज आणि संघटन

या कंपनीने विमान सेवेबरोबर देशातील ज्या ५ स्थानिक विमान सेवा आपल्या मालकीच्या केल्या आणि त्या या कंपनीला साहाय्यभूत झाल्या त्या खालीलप्रमाणे आहेत.

  • J-एर, - तोक्यो, नागोया आणि ओसाका या प्रादेशिक जेट सेवा.
  • JAL एक्सप्रेस, दुय्यम शहरातील किफायतशीर जेट सेवा
  • जपान एर कम्यूटर,- आमामी आयलंडसह पछिम जपान,मध्ये तुरबोपरोप सेवा
  • जपान ट्रान्सुसिन एर – ओकिनाव्हा प्रिफेक्चर आणि आमामी आयलंडसाठी जेट सेवा.
  • र्युकयू एर कम्यूटर- ओकिनाव्हा प्रिफेक्चर आणि आमामी आयलंडसाठी जेट सेवा.

या विमान कंपनीची आंतरराष्ट्रीय साहाय्यक विमाने कमी प्रमाणात मिळणारे उत्पन्नाचे हवाई, ओकेयनीय, आणि दक्षिण एशियामध्ये विमान सेवा देतात. JALUXची स्थापना १९६२ साली झाली.[] हे या विमान कंपनीला त्यांच्या व्यवसायात मदत करतात. यांची विमाने कोणती असावीत याची निवड करतात. त्यातील आहार, अल्पोपाहार, विक्रीच्या वस्तु, इंधन,केबिन सेवा, विनाकर वस्तु या निवडणे आणि पुरविणे यात लक्ष घालतात. मालवाहतुक व टपाल वाहतुकीसाठी JAL CARGO ही WOW संघटनेची सभासद आहे. ३१ मार्च २००९ अखेर या विमान सेवेने ५००७७९ टन आंतरदेशीय आणि ६२७२१३ टन आंतरराष्ट्रीय माल वाहतूक केली

१ एप्रिल २०११ रोजी या विमान कंपनीने तिचे जपान एरलाइन्स आंतरराष्ट्रीय कंपनी लिमिटेड. हे नाव रद्द करून जपान एरलाइन्स कंपनी लिमिटेड असे केले. लंडर असोशिएटने १९८९ मध्ये जपान एरलाइन्स कंपनीचे ओळख चिन्ह बनविले. जपान एरलाइन्स आणि जपान एर सिस्टिमचे एकत्रीकरण झाल्यानंतर नवीन ओळख निर्माण होण्यासाठी लंडरचे तोक्यो कार्यालय आणि जपान एरलाइन्सचे कामकाज एकत्रित चालू झाले. लंडर यांनी सूर्य (“ARC OF THE SUN”) हे बोधचिन्ह वापरण्याचे ठरविलेले होते. २००० सालचे बोधचिन्हाचे बदलाची सुरुवात एप्रिल २००२ मध्ये झाली आणि एप्रिल २००४ मध्ये पूर्ण झाली.[] ३००००० स्पेशल चीन्हामधून जपान एरलाइन्ससाठी बोध चिन्ह निवडले. १-४-२०११ मध्ये पुन्हा बदलले आणि सन १९५९ मध्ये जे होते ते कायम केले.

गंतव्य ठिकाण

जपान एरलाइन्स सांघिक विमान सेवेशिवाय आशिया खंडात अमेरिका, युरोप, ओशेनिया, या देशांतील ३३ आंतरराष्ट्रीय ठिकाणी विमान सेवा पुरविते. तसेच हा संघ जपानच्या ५९ ठिकाणी देशान्तर्गत विमान सेवा देतो.[]

भागीदारी आणि कायदेशीर सेवाकरार

जगभरातील खालील विमान कंपन्यांबरोबर जपान एरलाइन्सने कायदेशीर सेवाकरार आणि एकत्रित व्यवसाय करार केले आहेत.

  • अमेरिकन एरलाइन्स (ट्रान्स-पॅसिफिकसाठी एकत्रित व्यवसाय करार व भागीदारी)
  • ब्रिटिश एरवेझ (सायबेरियन एकत्रित व्यवसाय भागीदारी)
  • कथे पॅसिफिक
  • लाटम एरलाइन्स,
  • मलेशिया एरलाइन्स
  • कांटास
  • कतार एरवेझ
  • फिंनाईर
  • S7 एरलाइन्स
  • श्रीलंकन एरलाइन्स

याशिवाय जपान एरलाइन्सने जगभरात खालील विमान कंपन्यांशी भागीदारी, व कायदेशीर सांघिक करार केले आहेत.

  • एर फ्रान्स
  • बँकॉक एरवेझ
  • चायना एरलाइन्स
  • चायना ईस्टर्न एरलाइन्स
  • चायना दक्षिण एरलाइन्स
  • एमिरेटस
  • जेटब्लू एरवेझ
  • जेटस्टार जपान
  • कोरियन एर
  • व्हिएटनाम एरलाइन्स
  • वेस्टजेट

मालवाहतुक (Cargo)

जपान एरलाइन्सने सुरुवातीपासून ३० वर्षे विमाने चालवल्यानंतर ऑक्टोबर २०१० मध्ये ही विमान सेवा बंद केली. प्रवासी विमानातच तळाच्या भागात अल्प प्रमाणात ही सेवा चालू आहे.

विमान सेवा

या विमानात प्रवाशांच्या सोयीसाठी प्रथम वर्ग, स्कायस्लीपर सोलो किंवा स्कायस्लीपर एक्झिक्युटि्व्ह वर्ग, सीझन्स सेल फ्लॅट सीट किंवा स्काय लक्स सीट, प्रीमियम किफायतशीर स्काय सेल सीट आणि किफायत वर्ग आहेत.

संदर्भ

  1. ^ "जपान एरलाइन्सच्या विमान संच बद्दल".
  2. ^ "२०१५ मधील जगातील सर्वात मोठी विमान कंपनी".
  3. ^ "जपान एरलाइन्सचा इतिहास".
  4. ^ "जपान एरलाइन्सची सेवा". 2016-07-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-08-08 रोजी पाहिले.
  5. ^ "जपान एरलाइन्स कॉर्पोरेट प्रोफाइल". 2006-03-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-08-08 रोजी पाहिले.
  6. ^ "जपानी योजना जाहीर".
  7. ^ "जपान एरलाइन्सची गंतव्ये स्थाने". 2016-08-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-08-08 रोजी पाहिले.