जनुक कोश
जनुक कोश म्हणजे जनुकीय संपत्ति टिकवण्याचे एक साधन. आज असे जनुक कोश हे मुख्यतः स्थलबाह्य भांडारांच्या स्वरूपात बनवलेले आहेत. अशा भांडारांत अत्यंत थंड तपमानात वनस्पतींचे अंश, अथवा बिया साठवल्या जातात. प्राण्यांच्यात ही भांडारे खास थंड तपमानात ठेवलेल्या शुक्र व अंडयांच्या रूपात असतात. जिवंत मादीच्या अभावी आज तरी अशा अंड्यांचा, शुक्रबीजांचा वापर करण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध नाही. पण, जनुकीय संपत्ति राखून ठेवणे हे काही मानवी इतिहासात आजच सुरू झालेले नाही. अनादि कालापासून मानवी समाज देवरायात, देवडोहात, देवतलावात जैवविविधतेला संरक्षण देत आलेले आहेत,[१] आणि या प्रथा महाराष्ट्रात आजही जिवंत आहेत[१]
हे सुद्धा पहा
- महाराष्ट्र जनुक कोश उपक्रम
- प्रकल्प विकिपीडिया:वनस्पती
- ^ a b http://www.loksatta.com/daily/20051003/raj03.htm Archived 2016-03-10 at the Wayback Machine.. दि.२४ जुलै २००९ रोजी प्रसृत झालेल्या दैनिक लोकसत्ता मधिल सकाळी 06:55:32 GMT ला घेतलेली छायाप्रत.
- वर्ग:विज्ञान।जिवशास्त्र
- वर्ग:सार्वजनिक लोकहिताचे उपक्रम