जनावरांचे वजन मोजणे
जनावरांचे वजन मोजणे हे
- आपण जनावरांना दररोज जे खाद्य व पाणी देत असतो याचे प्रमाण ठरवणे यासाठी उपयोगी ठरते.
- जनावराची किंमत ठरवणे.
- जनावराचे गर्भधारणेचे व प्रजननासाठी योग्य वय याविषयी माहिती मिळते.
ग्रामीण भागात जनावराचे वजन मोजता येईल एवढा मोठा वजनकाटा शक्यतो उपलब्ध होत नाही. अशावेळी सूत्राच्या साहायाने वजन मोजणे या पद्धतीचा वापर करता येतो. यासाठी लांबी मोजण्याचा टेप व गणकयंत्र त्यांचा उपयोग करता येईल.
मोजण्याची पद्धत :
प्रथम मोजण्याचा टेपने शरीराची लांबी ( इंच ) व छातीचा घेर ( इंच ) मोजून घ्यावा. या संख्या खालील सूत्रांमध्ये टाकून वजन मोजावे. येणारे उत्तर (जनावरांचे वजन) हे पौंडामध्ये येईल
( १पौंड =०.४५ किलो )
१) अग्रवाल यांचे सूत्र -
हे देशी गायीचे वजन मोजण्यासाठी उपयुक्त ठरते.
वजन = शरीराची लांबी × छातीचा घेर/Y
- Yची किंमत छातीच्या घेरानुसार बदलते.
- छातीचा घेर ६५ इंचापेक्षा कमी असल्यास Y=९
- छातीचा घेर ६५ ते ८० इंच दरम्यान असल्यास Y=८.५
- छातीचा घेर ८० इंचापेक्षा जास्त असल्यास Y=८
2) शेफर्स यांचे सूत्र -
शेफर्स यांचे सूत्र हे संकरित व विदेशी गायीचेया वजन मोजण्यासाठी उपयुक्त ठरते.
वजन = शरीराची लांबी × (२ × छातीचा घेर) / ३००.