जनार्दन वाघमारे
डॉ. जनार्दन माधवराव वाघमारे, एम.ए. पीएच.डी. ( कौठा, तालुका-औसा, ११ नोव्हेंबर १९३४) हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे पहिले कुलगुरू होत.
वाघमारे हे इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक, निग्रो साहित्याचे भाष्यकार, दलित पुरोगामी साहित्य चळवळीचे अभ्यासक आणि शिक्षणतज्ज्ञ आहेत. त्यांचे शिक्षण कौठा, लातूर, हैद्राबाद, औरंगाबाद येथे झाले. ‘The Problem of Identity in the Postwar American Negro Novel’ हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता. डॉ. यांनी खासदार, कुलगुरू, प्राचार्य, प्राध्यापक अशा अनेक पदांवर काम केले.
वाघमारे यांचे प्रकाशित साहित्य
डॉ. जनार्दन माधवराव वाघमारे यांनी मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषेत लेखन केले आहे.
वैचारिक
- ‘अमेरिकन नीग्रो : साहित्य आणि संस्कृती’ (१९७८) हा पहिला अमेरिकन नीग्रोंचे विवेचन करणारा ग्रंथ.
- ‘आजचे शिक्षण : स्वप्न आणि वास्तव’ (१९९३)
- चिंतन एका कुलगुरूचे’ (१९९९)
- ‘चिंतनयात्रा’ (२००४)
- ‘दलित साहित्याची वैचारिक पार्श्वभूमी’ (२०१३)
- ‘परिवर्तन : संकल्पना, वेध आणि वास्तव’ (१९९९)
- ‘प्राथमिक शिक्षण : यशापयश आणि भवितव्य’ (१९८२)
- ‘बदलते शिक्षण : स्वरूप आणि समस्या’ (२००९)
- ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जातिअंताचा लढा’ (१९९०)
- ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे क्रांतिकारक शैक्षणिक विचार आणि कार्य’ (२०१५)
- ‘महाराष्ट्रातील राजकारण व समाजकारण’ (१९८०)
- ‘माझे मूळ : माझे कूळ’ (२०१५)
- ‘लोकशाही आणि शिक्षण’ (२०१२)
- ‘विमर्श’ (२०१५)
- ‘विचारमुद्रा’ (२०११)
- ‘शरद पवार : व्यक्तित्व, कर्तृत्व आणि नेतृत्व’ (२०१६)
- ‘शिक्षण : समाज परिवर्तन व राष्ट्रीय विकास’ (१९८४)
- ‘संपादन : कर्तृत्वाचा सह्याद्री’ (२०१३)
- ‘साहित्यचिंतन’ (१९९६)
- ‘स्वातंत्र्य : एक चिंतन’(२०१६)
- 'हाक आणि आक्रोश’ (१९८४)
प्रवासवर्णन
- ‘ज्ञान - विज्ञानाच्या देशात’ (२००५)
कादंबरी
- ‘बखर एका खेड्याची’ (२००५)
आत्मचरित्रात्मक कादंबरी
- ‘चिंतन एका नगराध्यक्षाचे’ (२००६)
- ‘मूठभर माती’ (२००६)
व्यक्तिचित्रणे
- ‘जीवनरेखा’ (२००?)
- मला माहीत असलेले शरद पवार (संपदित, नऊ सहलेखक)
- ‘व्यक्तित्व आणि कर्तृत्व’ (२०१५)
- ‘व्यक्तिवलये’ (२००५)
- ‘स्वामी दयानंद सरस्वती : विचार, कार्य व कर्तृत्व’ (२०१०)
ललित लेखसंग्रह
- बखर एका खेड्याची
- ‘मंथन’ (२०१०)
- ‘मातीवरच्या ओळी’ (२०१०)
- यमुनेचे पाणी
- राज्यसभेतील सहा वर्षे (२००८ ते २०१४)
- ‘सहजीवन’ (२०१२)
अनुवादित ग्रंथ
- ‘एक शिक्षाविद् का चिंतन’ (१९९९)
- ‘ध्यास परिवर्तनाचा’ (२०११) हा गौरवग्रंथ
- ‘महर्षि दयानन्द सरस्वती : विचार, कार्य और कृतित्व’ (२०१२)
- ‘दलित साहित्य की वैचारिक पृष्ठभूमि’ (२०१३)
- ‘समाज परिवर्तन कि दिशाएँ’ (हिंदी, १९९५)
- ‘संवाद’ (२००६) : हा आकाशवाणीवरचा भाषणसंग्रह
- ‘साहित्यचिंतन’ (२०१६)
इंग्लिश साहित्य
- ‘My Days In Parliament’ (२०१७)
- ‘The Horizons And Beyond’ (२००६)
- ‘The Quest for Black Identity’ (२००२)
- ‘Sharad Pawar : A Profile in Leadership’ (२००९)