Jump to content

जगातील सात आश्चर्ये

जगातील सात आश्चर्ये ही पृथ्वीवरील अद्भुत (व काही अंशी काल्पनिक) अशा नैसर्गिक किंवा बांधल्या गेलेल्या ठिकाणे/वास्तू ह्यांची यादी आहे. संपूर्ण इतिहासात, अशा विविध आश्चर्यांची यादी तयार केली गेली आहे आणि लोकांनी ती स्वीकारली आहे. खाली अशा विविध याद्यांचा सारांश आहे.

प्राचीन जगतातील सात आश्चर्ये

पुरातन काळातील सात आश्चर्ये.

पुरातन काळातील सात आश्चर्ये मध्ये खालील आश्चर्यांचा समावेश होतो. ही यादी ग्रीक इतिहासकार हिरोडोटस आणि विद्वान कॅलिमाचस यांनी बनवली होती.[]

याशिवाय, संपूर्ण मध्य युगात, इतर विविध ठिकाणे देखील जगातील आश्चर्य मानली जात होती.[][][]

आधुनिक जगातील सात आश्चर्ये

मानवनिर्मित बांधकामे

अमेरिकन सोसायटी ऑफ सिव्हिल इंजिनिअर्सने १९९४ मध्ये मानवनिर्मित बांधकामांचे सात आश्चर्ये जाहिर केले.[][]

आश्चर्यबांधकाम सुरुवातउद्घाटनठिकाणचित्र
चॅनल टनेल१ डिसेंबर १९८७६ मे १९९४डोव्हरची सामुद्रधुनी
सी.एन. टॉवर६ फेब्रुवारी १९७३२६ जून १९७६टोरॉंटो, कॅनडा
एम्पायर स्टेट बिल्डिंग२२ जानेवारी १९३०मे १९३१न्यू यॉर्क शहर, अमेरिका
गोल्डन गेट ब्रिज५ जानेवारी १९३३२७ मे १९३७सॅन फ्रान्सिस्को, अमेरिका
इटाइपू धरणजानेवारी १९७०५ मे १९८४पाराना नदी, ब्राझिल व पेराग्वे दरम्यान
डेल्टा कार्य आणि झॉयडरझी कार्या१९२०१० मे १९९७नेदरलँड्स
पनामा कालवा१ जानेवारी १८८०७ जानेवारी १९१४पनामा

यूएसए टुडे नवीन सात आश्चर्ये

नोव्हेंबर २००६ मध्ये, अमेरिकन वृत्तपत्र "यूएसए टुडे" ने नवीन सात आश्चर्ये प्रकाशित केली. यात नैसर्गिक आश्चर्ये आणि मानवनिर्मित आश्चर्ये दोन्ही समाविष्ट होते. लोकांच्या आग्रहास्तव ह्या यादीत ग्रँड कॅनियनचा समावेश करण्यात आला.[][]

आश्चर्यठिकाणचित्र
पोताला महालतिबेट
जेरुसलेमचे जुने शहरइस्रायल ध्वज इस्रायल
ध्रुवीय बर्फपृथ्वीचे ध्रुवीय प्रदेश (आर्क्टिक आणि अंटार्क्टिक)
पापहानौमोकुआकेआ सागरी राष्ट्रीय स्मारकFlag of the United States अमेरिका
महाजालजगभर
माया संस्कृतीचे अवशेषमेक्सिको ध्वज मेक्सिको
सेरेनगेटी आणि मासाई मारा येथील महान स्थलांतरटांझानिया टांझानिया आणि केन्या केन्या
ग्रँड कॅनियनFlag of the United States अमेरिका

जगातील सात नैसर्गिक आश्चर्ये

१९९७ मध्ये सीएनएनने जगातील सात नैसर्गिक आश्चर्यांची यादी संकलित केली.[]

आश्चर्यठिकाणचित्र
ध्रुवीय प्रकाशपृथ्वीचे ध्रुवीय प्रदेश (आर्क्टिक आणि अंटार्क्टिक)
ग्रँड कॅनियनFlag of the United States अमेरिका
ग्रेट बॅरियर रीफऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
गुआनाबारा खाडीब्राझील ध्वज ब्राझिल
एव्हरेस्टनेपाळ नेपाळचीन चीन
पारिकुटीन ज्वालामुखीमेक्सिको ध्वज मेक्सिको
व्हिक्टोरिया धबधबाझांबिया झांबियाझिम्बाब्वे झिम्बाब्वे

न्यू७ वंडर्स याद्या

२००१ मध्ये, स्विस कॉर्पोरेशन न्यू७ वंडर्स फाऊंडेशनने ऑनलाइन मतांद्वारे २०० विद्यमान स्मारकांमधून जगातील नवीन सात आश्चर्ये निवडण्यासाठी एक उपक्रम सुरू केला. त्यानंतर त्यांनी अनेक असे "नवीन सात निसर्गाचे आश्चर्य" (२००७-११) आणि "नवीन सात आश्चर्य शहरे" (२०११-१४) चे देखील आयोजन केले.

जगातील सात नवी आश्चर्ये

२००७ साली जगभर झालेल्या मतदानातून खालील सात आधुनिक आश्चर्यांची निवड करण्यात आली.[१०][११][१२]

आश्चर्यठिकाणचित्र
चिचेन इट्झामेक्सिको युकाटन, मेक्सिकोएल कॅस्टिलो
ख्रिस्ट द रिडीमरब्राझील रियो दि जानेरो, ब्राझिल
ख्रिस्ट द रिडीमर पुतळा
ख्रिस्ट द रिडीमर पुतळा
कलोसियमइटली रोम, इटलीकलोसियम
चीनची भिंतचीन चीनचीनची भिंत
माचु पिच्चुपेरू कुझको, पेरू
माचु पिच्चु
माचु पिच्चु
पेट्राजॉर्डन जॉर्डन
पेट्रा येथील कोषागार
पेट्रा येथील कोषागार
ताज महालभारत आग्रा, भारतताज महाल
गिझाचा भव्य पिरॅमिड † - मानाचे स्थानइजिप्त कैरो, इजिप्तखुफूचा पिरॅमिड

नवीन सात निसर्गाचे आश्चर्य

आश्चर्यठिकाणचित्र
इग्वाझू धबधबाआर्जेन्टिना आर्जेन्टिना आणि ब्राझील ब्राझिलच्या सीमेवर
हा लाँग बेव्हियेतनाम ध्वज व्हिएतनाम
जेजू बेटदक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया
प्वेर्तो प्रिन्सेसा भूमिगत नदीFlag of the Philippines फिलिपिन्स
टेबल माउंटनदक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका
कोमोडो बेटइंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
ॲमेझॉन वर्षावनदक्षिण अमेरिका

नवीन सात आश्चर्य शहरे

आश्चर्यठिकाणचित्र
डर्बनदक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका
विगनFlag of the Philippines फिलिपिन्स
हवानाक्युबा ध्वज क्युबा
क्वालालंपुरमलेशिया ध्वज मलेशिया
बैरूतलेबेनॉन ध्वज लेबेनॉन
दोहाकतार ध्वज कतार
ला पाझबोलिव्हिया ध्वज बोलिव्हिया

पाण्याखालील जगाची सात आश्चर्ये

समुद्र संरक्षण आणि संशोधनासाठी समर्पित असलेल्या डायव्हर्ससाठी अमेरिकन-आधारित गट, CEDAMने "पाण्याखालील जगाची सात आश्चर्यांची" यादी तयार केली आहे. १९८९ मध्ये, CEDAM ने युजेनी क्लार्कसह सागरी शास्त्रज्ञांचे एक पॅनल एकत्र आणले व संरक्षणासाठी योग्य वाटतील अशी पाण्याखालील क्षेत्रे निवडली.[१३]

आश्चर्यठिकाणचित्र
पलाउपलाउ ध्वज पलाउ
बेलीझ बॅरियर रीफबेलीझ ध्वज बेलीझ
ग्रेट बॅरियर रीफऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
उष्णजलीय छिद्रजगभर
बैकाल सरोवररशिया ध्वज रशिया
गॅलापागोस बेटेइक्वेडोर ध्वज इक्वेडोर
लाल समुद्रइजिप्त इजिप्त, सौदी अरेबिया सौदी अरेबिया,
यमनचे प्रजासत्ताक येमेन, इरिट्रिया इरिट्रिया,
सुदान सुदान, जिबूती जिबूती

औद्योगिक जगतातील सात आश्चर्ये

ब्रिटिश लेखिका डेबोरा कॅडबरी यांनी औद्योगिक जगाचे सात आश्चर्य लिहिले, हे पुस्तक १९ व्या आणि २० व्या शतकाच्या सुरुवातीच्या अभियांत्रिकीच्या सात महान पराक्रमांच्या कथा सांगणारे पुस्तक आहे. २००३ मध्ये, बीबीसीने सात भागांचा माहितीपट प्रसारित ज्याच्या निर्माता कॅडबरी होत्या.[१४][१५]

आश्चर्यठिकाणचित्र
एस.एस. ग्रेट ईस्टर्नइंग्लंड ध्वज इंग्लंड
बेल रॉक दीपगृहस्कॉटलंड ध्वज स्कॉटलंड
ब्रुकलिन ब्रिजFlag of the United States अमेरिका
लंडनची सांडपाणी व्यवस्थाइंग्लंड ध्वज इंग्लंड
पहिला ट्रान्सकॉन्टिनेंटल रेल्वेमार्गFlag of the United States अमेरिका
पनामा कालवापनामा ध्वज पनामा
हूवर धरणFlag of the United States अमेरिका

सूर्यमालेचे सात आश्चर्य

१९९९ च्या एका लेखात, खगोलशास्त्र या अमेरिकन मासिकाने "सूर्यमालेचे सात आश्चर्य" सूचीबद्ध केले.[१६]

आश्चर्यठिकाणचित्र
एन्सेलाडसशनी ग्रहाचा उपग्रह
ग्रेट लाल ठिपकेगुरू ग्रह
लघुग्रह पट्टामंगळ आणि गुरू ग्रहाच्या दरम्यान
फोटोस्फीअरसूर्याचा पृष्ठभाग
पृथ्वीवरील महासागरपृथ्वी
शनीच्या कड्याशनी ग्रह
ऑलिंपस मॉन्समंगळ ग्रह

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ Clayton, Peter; Martin J. Price (1990). The Seven Wonders of the Ancient World. Routledge. p. 4. ISBN 978-0-415-05036-4.
  2. ^ Evans, I H (reviser (1975). Brewer's Dictionary of Phrase and Fable (Centenary edition Fourth impression (corrected) ed.). London: Cassell. p. 1163.
  3. ^ Latham, Edward (1904). A Dictionary of Names, Nicknames and Surnames, of Persons, Places and Things. p. 280. OCLC 01038938.[permanent dead link]
  4. ^ Miller, Francis Trevelyan (1915). America, the Land We Love. p. 201. OCLC 00334597. December 1, 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. October 16, 2020 रोजी पाहिले. Excerpts from speeches by Woodrow Wilson, William H. Taft, and Theodore Roosevelt.
  5. ^ "American Society of Civil Engineers Seven Wonders". ASCE.org. July 19, 2010. August 2, 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. August 30, 2010 रोजी पाहिले.
  6. ^ American Society of Civil Engineers. "Seven Wonders of the Modern World". ASCE.org. 2010-04-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  7. ^ "New Seven Wonders panel". USA Today. October 27, 2006. July 31, 2010 रोजी पाहिले.
  8. ^ Clark, Jayne (December 22, 2006). "The world's 8th wonder: Readers pick the Grand Canyon". USA Today. June 19, 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. May 3, 2013 रोजी पाहिले.
  9. ^ "Natural Wonders". CNN. November 11, 1997. July 21, 2006 रोजी मूळ पान पासून संग्रहित. July 31, 2010 रोजी पाहिले.
  10. ^ "The multimedia campaign to choose the New 7 Wonders of the World is in its final stage". New7Wonders. January 3, 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 June 2015 रोजी पाहिले.
  11. ^ "Egypt's pyramids out of seven wonders contest". Daily News Egypt. April 20, 2007. June 25, 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 25 June 2018 रोजी पाहिले.
  12. ^ "Reuters via ABC News Australia "Opera House snubbed as new Wonders unveiled" 7 July 2007". Australia: ABC. July 8, 2007. June 29, 2011 रोजी मूळ पानापासून संग्रहित. July 31, 2010 रोजी पाहिले.
  13. ^ "Underwater Wonders of the World". Wonderclub. जून 13, 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ऑगस्ट 31, 2010 रोजी पाहिले.
  14. ^ Cadbury, Deborah (17 February 2011). "British History in Depth: Seven Wonders of the Industrial World". December 27, 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2015-03-25 रोजी पाहिले.
  15. ^ Kumar, Manjit (7 November 2003). "Review: Seven Wonders of the Industrial World by Deborah Cadbury". The Guardian. September 21, 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. December 13, 2016 रोजी पाहिले.
  16. ^ "Seven Wonders of the Solar System Video". Aaa.org. 1999. April 1, 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-02-22 रोजी पाहिले.