Jump to content

जगन्नाथ शिंदे

भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि सोलापूर

   भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सोलापूरचे

फार मोठे योगदान आहे.

हुतात्मा जगन्नाथ शिंदे यांचे कार्य

  हुतात्मा जगन्नाथ शिंदे यांचा जन्म १९०६ साली झाला.रेल्वे कामगार आणि गिरणी कामगार संघटनेत ते कार्यरत होते.सोलापूर येथील सार्वजनिक उत्सवात ते सक्रीय होते.सार्वजनिक गणेश उत्सव,नवरात्रोत्सव,बालगणेश मेळाव्याचे ते आधारस्तंभ होते.

तत्कालीन राजकीय परिस्थिती आणि त्याचे परीणाम याविषयी त्यांनी जनजागरण केले.मुंबईतील सत्यशोधक परिषदेत त्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

महात्मा गांधीचा मीठाचा सत्याग्रह

  महात्मा गांधीनी मिठाचा सत्याग्रह सुरू केल्यापासून सोलापुरात दररोज सभा व्हायच्या.८ मे १९३० साली जमनालाल बजाज 

आणि वीर नरीमन यांना अटक झाल्याची बातमी सोलापुरात थडकली. यातूनच हिंसाचार झाला.त्यावेळी युवक संघाने मिरवणूक काढली.त्यामध्ये जगन्नाथ शिंदे सहभागी झाले होते.जमावातील काही लोक रूपाभवानी मंदिर परिसरात शिंदीची झाडे तोडण्यासाठी गेले.त्यावेळी हिंसाचार,गोळीबार झाला.यात जगन्नाथ शिंदे यांचा सहभाग नव्हता तरी ब्रिटिश सरकारच्या रोषाला ते बळी पडले. जगन्नाथ शिंदे यांना सरकारने अटक केली आणि त्यांच्यासह चार हुतत्म्यांवर खटला चालवून पुणे येथील येरवडा कारागृहात दिनांक १२ जानेवारी १९३१ रोजी जगन्नाथ शिंदे,मल्लाप्पा धनशेट्टी,किसन सारडा आणि कुर्बान हुसेन या चार हुतात्म्यांना फाशी देण्यात आली. साचा:वर्गःसोलापूर शहर