जगन्नाथ पंडित
जगन्नाथ पंडित हे १७व्या शतकातील एक संस्कृत कवी होते. ते मुघल सम्राट जहांगीर व शाहजहानच्या पदरी होते.
एकदा जगन्नाथ पंडित दरबारात असताना शहाजहानची लवंगी नावाची मुलगी तेथे आली व निघून गेली. जगन्नाथ पंडिताने तिच्यावर
- इयं सुस्तनी मस्तकन्यस्तकुंभा लवंगी कुरंगी दृगंगीकरोतु ॥
अशी काव्यरचना केली. शहाजहानने खुश होऊन लवंगीचा जगन्नाथाशी विवाह करून दिला. एखाद्या मुसलमानाने खुशीने आपल्या मुलीचे लग्न हिंदू वराशी करून देण्याचे हे दुर्मिळातले दुर्मिळ उदाहरण आहे.
मुसलमान स्त्रीशी लग्न केल्याने काशीच्या पंडितांनी जगन्नाथावर बहिष्कार घातला. हा बहिष्कार जगन्नाथ पंडिताला सहन झाला नाही. आपल्या पत्नीसह तो गंगाघाटाच्या वरच्या पायरीवर बसला. तेथे बसून त्यांच्या गंगेच्या स्तुतिपर अशा गंगालहरी काव्याची निर्मिती केली. त्या काव्याचे एकेक कडवे (श्लोक) म्हटल्यावर गंगेची पातळी एकेक पायरी वर चढली. ५२ श्लोकांनंतर पाण्याची पातळी ५२ पायऱ्या वर चढली, आणि गंगेच्या वाढलेल्या पाण्यात जगन्नाथ पंडित आणि त्याची पत्नी वाहून गेले.
ज्येष्ठ महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून गंगा दशमीपर्यंत (गंगा दशहरा संपायच्या दिवसापर्यंत) लोक देवळांमध्ये आणि गंगेच्या काठी बसून 'गंगालहरी' काव्याचे पारायण करतात.
जगन्नाथ पंडितांची साहित्य संपदा
- गंगालहरी (काव्य). या काव्याचे मराठीत दोन समश्लोकी अनुवाद आहेत, एक वामन पंडिताचा आणि दुसरा ल.गो. विंझे यांचा.
- पंचविलास
- भामिनीविलास (विविध वेळी लिहिलेल्या कवितांचा संग्रह)
- रसगंगाधर (काव्यशास्त्रावरील ग्रंथ)
मराठी साहित्यात जगन्नाथ पंडित
- संगीत पंडितराज जगन्नाथ (नाटक, लेखक - विद्याधर गोखले)