मिस वर्ल्ड (इंग्लिश: Miss World) ही जगातील सर्वात जुनी आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा आहे. लंडन येथे मुख्यालय असलेली ही स्पर्धा १९५१ साली युनायटेड किंग्डममध्ये स्थापन करण्यात आली. मिस युनिव्हर्स व मिस ग्रँड इंटरनेशनलसोबत मिस वर्ल्ड ही जगातील सर्वात लोकप्रिय स्पर्धा मानली जाते.
ह्या स्पर्धेत प्रवेश मिळवण्यासाठी स्पर्धक महिलांना आपापल्या देशामधील सौंदर्यस्पर्धांमध्ये विजय मिळवणे आवश्यक आहे. भारतामधीलफेमिना मिस इंडिया स्पर्धेमध्ये फेमिना मिस इंडिया वर्ल्ड हा खिताब जिंकणाऱ्या महिलेला मिस वर्ल्डमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडले जाते.
आजवर ५ भारतीय महिलांनी मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकली असून ह्याबाबतीत भारताचा व्हेनेझुएलाखालोखाल जगात दुसरा क्रमांक लागतो.