Jump to content

जंगली लावा

जंगली लावा
नर
नर
मादा
मादा
प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: Vertebrata (पृष्ठवंशी)
जात: Aves (पक्षी)
वर्ग: Galliformes (गॅलिफॉर्मेस)
कुळ: Phasianidae (फॅसिनिडी)
जातकुळी: Perdicula (पर्डिक्युला)
जीव: Perdicula asiatica (पर्डिक्युला एशियाटिका)
जंगली लावाचा आढळप्रदेश
जंगली लावाचा आढळप्रदेश
इतर नावे
  • Perdix asiatica लॅथम, १७९०

जंगली लावा, गेरजा, किंवा बेरडा लावा (इंग्रजी: Jungle Bush-quail) हा एक पक्षी आहे.

हा पक्षी आकाराने मोठ्या लाव्या पेक्षा लहान असून वरून पिगट तपकिरी रंगाचा असतो. त्यावर काळ्या व बदामी रंगाचे ठिपके व पट्टे असतात. ते थव्याने जमिनीवर आढळतात .

हा पक्षी भारतात गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, ओरिसा, कर्नाटक आणि उत्तर आंध्र प्रदेशात आढळतो.

वर्गीकरण

जॉन लॅथम यांनी १७९० मध्ये "महारट्टा प्रदेश" मधील नमुन्यांच्या आधारे जंगली लव्याचा Perdix asiatica (पर्डिक्स एशियाटिका) असे वर्णन केले होते.[] १८३७ मध्ये ब्रायन हॉजसन यांनी हे Perdicula (पर्डिक्युला) या वंशात हलवले.[] Perdicula हे वंशीय नाव Perdix या वंशाचे लॅटिन अल्पार्थवाचक शब्द आहे आणि त्याचा अर्थ "छोटा तीतर" आहे. asiatica हे नाव लॅटिन asiaticus मधून आले आहे आणि त्याचा अर्थ "आशियाई" आहे.[] ह्याचे मराठीत नाव जंगली लावा आहे आणि इंग्रजीत नाव "jungle bush quail" (जंगल बुश क्वेल) आहे.[]

निवासस्थाने

गवताळ आणि झुडपी जंगले तसेच दुय्यम दर्जाची पानगळीची वने .डोंगराळ भागात १२५० मिटर उंचीपर्यंत असते .

संदर्भ

  1. ^ लॅथम, जॉन (१७९०). Index ornithologicus, sive, Systema ornithologiae : complectens avium divisionem in classes, ordines, genera, species, ipsarumque varietates : adjectis synonymis, locis, descriptionibus, &c (लॅटिन भाषेत). 2. लंडन. pp. ६४९–६५०.
  2. ^ कॉटरेल, जी. विल्यम; ग्रीनवे, जेम्स सी.; मेयर, अर्न्स्ट; पेंटर, रेमंड ए.; पीटर्स, जेम्स ली; ट्रेलर, मेल्विन ए. (१९३४). Check-list of birds of the world (इंग्रजी भाषेत). . केंब्रिज: हार्वर्ड युनिव्हर्सिटी प्रेस. pp. ९७.
  3. ^ जोब्लिंग, जेम्स ए. (२०१०). Helm Dictionary of Scientific Bird Names. ख्रिस्तोफर हेल्म. pp. २९७, ५७. ISBN 978-1-4081-3326-2.
  4. ^ Gill, Frank; Donsker, David; Rasmussen, Pamela (eds.). "Pheasants, partridges, francolins – IOC World Bird List" (इंग्रजी भाषेत). 2021-07-14 रोजी पाहिले.