छोटी बडी बातें
छोटी बडी बातें दूरदर्शन वरील अंधश्रद्धेवरील एक जुनी मालिका होती. या मालिकेत सुलभा देशपांडे, अरविंद देशपांडे, बब्लू मुकर्जी व अशोक सराफ यांनी काम केले आहे. सुलभा देशपांडे यांचा या मालिकेत अंधश्रद्धेवर खूपच विश्वास असतो तर परिवारातील इतर मंडळी तिला चुकीचे ठरविण्याचा प्रयत्न करीत असतात. शेवटच्या भागात सर्व पात्रे आपल्या भूमिका सोडून वावरले आहेत. आणि त्यात अशोक सराफ हे खुपच अंधश्रद्धाळू असल्याचे दाखवले आहे.