छोटा खाटिक
छोटा खाटिक (इंग्लिश:Indian Baybacked Shrike) हा एक पक्षी आहे.
ओळख
सर्वात लहान खाटिक पक्षी. सान्यासारखी बाकदार चोच. पांढरे व राखी डोके. चोच, डोळा आणि कपाळाला जोडणारी काळी पट्टी.तांबूस किरमिजी पाठ. खालील भाग पांढरा. काळी-पांढरी शेपटी.पांढुरका पार्श्वभाग.पंखांवर पांढरा पट्टा किंवा आरसा. नर- मादी दिसायला सारखे.
वितरण
निवासी. स्थानिक स्थलांतर करणारे. पाकिस्तान आणि भारत हिमालयाचा पायथा ते दक्षिणेकडे कन्याकुमारीपर्यंत व पूर्वेकडे बंगाल फेब्रुवारी ते सप्टेंबर या काळात वीण.
निवासस्थाने
पानगळीची शुष्क झुडपी जंगले.
संदर्भ
- पक्षीकोश - मारुती चितमपल्ली