Jump to content

छोटा कोतवाल

छोटा कोतवाल
छोटा कोतवाल

छोटा कोतवाल (इंग्लिश:Bronzed Drongo; हिंदी:छोटा केसराज; संस्कृत: कांस्य कृष्ण अंगारक; तेलगु:कंचु रंगु एट्रीत) हा एक पक्षी आहे.

ओळख

कोतवालपेक्षा आकाराने लहान सडपातळ बांधा, चकचकीत काळी पिसे. शेपटीचे टोक खोलवर दुभंगलेले.

आढळ

ऋतुमानाप्रमाणे स्थलांतर करणारे. मसुरीपासून हिमालयाचा पायथा ते भूतान आणि अरुणाचल प्रदेश. बांगला देश ते ब्रह्मदेश व बंगाल. पूर्व घाट आणि पश्चिम घाटाचा परिसर. दक्षिणेकडे तमिळनाडू, केरळ. सर्वसाधारणपणे मार्च ते जून या काळात वीण.

निवासस्थाने

पानगळीची आर्द्र व सदाहरितपर्णी वने.

संदर्भ

  • पक्षिकोश - मारुती चितमपल्ली