Jump to content

छोटा कंठेरी चिखल्या

छोटा कंठेरी चिखल्या
शास्त्रीय नाव कॅरेड्रियस डूबियस [टीप १]
कुळटिट्टिभाद्य
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश लिटल रिंग्ड प्लोवर [टीप २]
संस्कृत राजभट्टिका
हिंदी मेरवा
Charadrius dubius curonicus

छोटा कंठेरी चिखल्या किंवा कंठेरी चिलखा (शास्त्रीय नाव: Charadrius dubius, कॅरेड्रियस डूबियस ; इंग्लिश: Little Ringed Plover, लिटल रिंग्ड प्लोवर ;) हा टिट्टिभाद्य कुळातील छोट्या आकारमानाचा एक पक्षी आहे. याला मराठीत टीटवा, चुरकी, टिंबूल किंवा लहान तवी या नावांनीही ओळखतात. साधारण १७ सें.मी. आकारमानाचा हा पक्षी पाठीकडून मातकट-तपकिरी, पोटाकडून पांढरा, पाय पिवळे, जाड गोल डोक्याचा, कान आणि डोळ्यांभोवती गडद काळा भाग त्यात पिवळ्या रंगाची उठावदार चकती, विणीच्या काळात नराचा कंठ काळा असतो. यावरून याला छोटा कंठेरी चिखल्या असे नाव पडले. एरवी नराचा आणि मादीचा कंठ फिकट तपकिरी असतो.

याच्या रंग-आकारमानावरून किमान तीन उपजाती आहेत.

आवाज

Little Ringed Plover.ogg कंठेरी चिलख्याचा आवाज ऐका

आढळ

समुद्र किनारे, नद्या-तलावांचे किनारे, दलदली भाग येथे छोटा कंठेरी चिखल्या पक्षी हिमालयाच्या १ ते १.५ हजार मी. उंचीपर्यंत संपूर्ण भारतभर आढळतो तसेच बांगलादेश, पाकिस्तान, म्यानमार, श्रीलंका येथेही आढळतो.

खाद्य

पाण्यातील आणि जमिनीवरील विविध कीटक हे या पक्ष्यांचे मुख्य खाद्य आहे.

प्रजनन काळ

मुख्यत्वे मार्च ते मे हा काळ यांचा प्रजनन काळ आहे. यात स्थानिक बदलही आढळतात. जमिनीवर गडद रंगाच्या दगड-गोट्यांमध्ये मादी एकावेळी ३ किंवा ४, हिरवट राखाडी रंगाची त्यावर तपकिरी ठिपके असलेली, एका दिशेने गोलसर तर दुसरीकडून टोकदार अंडी देते. पिलांचे संगोपन नर-मादी मिळून करतात.

तळटिपा

  1. ^ कॅरेड्रियस डूबियस (रोमन: Charadrius dubius)
  2. ^ लिटल रिंग्ड प्लोवर (रोमन: Little Ringed Plover)

बाह्य दुवे

  • "कंठेरी चिलख्याची माहिती व चित्रे" (इंग्लिश भाषेत). 2007-08-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-04-19 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  • "छोटा कंठेरी चिखल्या" (इंग्लिश व बहुभाषी भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)