छाया दातार
छाया दातार | |
---|---|
जन्म | १९४४ भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | कार्यकर्त्या, लेखिका आणि स्त्रीवादी |
छाया दातार (जन्म १९४४) या एक भारतीय कार्यकर्त्या, लेखिका आणि स्त्रीवादी आहेत. छाया दातार मराठी आणि इंग्लिश भाषेत लिहितात.
कारकीर्द
छाया दातार या गृहिणी होत्या. परंतु गृहिणी पद्धतीच्या जीवनामुळे निराश झाल्या होत्या. त्यातून बाहेर पडून त्या लेखन करायला लागून आणि राजकीयदृष्ट्या सक्रिय झाल्या.[१] त्यांचा मराठीतील पहिला लघुकथा संग्रह, गोष्ट साधी सरळ सोपी हा १९७२ मध्ये आणि दुसरा वर्तुळाचा अंत १९७७ मध्ये लिहिला.[१] स्त्री उवाच नावाच्या मुंबईतील प्रकाशन समूहाच्या संस्थापकांपैकी एक आहे.[१] त्यांच्या लघुकथांनंतर, त्यांनी स्त्रियांच्या समस्यांचा अभ्यास करण्याचे काम सुरू केले.[१] वेजिंग चेंज: निपाणीतील महिला तंबाखू कामगार संघटना (१९८९), दातार यांनी सिगारेट कामगारांच्या संदर्भात निपाणीतील राजकीय आणि आर्थिक न्यायासाठी महिलांच्या संघर्षांचे परीक्षण केले.[२] साइन्समध्ये, समीक्षक चंद्र तळपदे मोहंती, लिहितात की दातार यांचे वेजिंग चेंज हे "महिला बिडी" कामगारांच्या संघटनात्मक इतिहासाचे एक सुंदर रचलेले, तपशीलवार विश्लेषण आहे."[२]
त्यांच्या आत्मचरित्रात्मक कथेत, इन सर्च ऑफ मायसेल्फ, तिने स्वतःचे अनुभव लिहिले आहेत. स्वतःच्या आदिवासी जगाशी संवाद साधल्याने स्त्रियांना स्वातंत्र्याची भावना कशी प्राप्त होते याचे वर्णन केले आहे.[३] आदिवासी स्त्रिया स्वतःचे अनुभव सांगून स्वतःला कसे शोधतात याचेही त्यांनी या कथेत वर्णन केले आहे.[३] दातार त्यांच्या कामांमध्ये दलित स्त्रीवादाची चर्चा करतात.
दातार हे समकालीन समाजशास्त्र,[४] इंडियन जर्नल ऑफ जेंडर स्टडीज,[५] इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली,[६][७] मध्ये प्रकाशित झालेले आहेत. मेन अगेन्स्ट व्हायोलेन्स अँड अब्यूज (मावा), पुरुष स्पंदन यांनी प्रकाशित केलेल्या जर्नलमध्ये योगदान दिले आहे.[८] त्यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिन २०१७ रोजी तरीही शेष पुस्तक प्रकाशित केले.[९]
निवडक पुस्तके
- गोष्ठ साधी, सरळ, सोपी (मराठी). पुणे: मेनका प्रकाशन. १९७३. ओसीएलसी ३१०९५३४६.
- मितरुणी (मराठी). मुंबई: अभिनव प्रकाशन. १९७९. ओसीएलसी ४९९५३३९७१.
- वेजिंग चेंज: वुमन टोबॅको वर्कर्स इन निपाणी ऑर्गनाईज. नवी दिल्ली: कली फॉर वुमन. १९८९. आयएसबीएन ९७८-८१८५१०७११०.
संदर्भ
- ^ a b c d Tharu, Susie J.; Lalita, Ke (1993). Women Writing in India: The twentieth century (इंग्रजी भाषेत). New York: The Feminist Press at The City University of New York. p. 495. ISBN 9781558610293.
- ^ a b Mohanty, Chandra Talpade (Summer 1995). "Book Reviews". Signs: Journal of Women in Culture and Society. 20 (4): 1058–1061. doi:10.1086/495039.
- ^ a b Ghosh, Anita (2004). "Woman on Top: A Study of Feministic Consciousness of Modern Indian Women Novelists". In Prasad, Amar Nath (ed.). New Lights on Indian Women Novelists in English (इंग्रजी भाषेत). New Delhi: Sarup & Sons. pp. 260–261. ISBN 9788176254779.
- ^ Datar, Chhaya (1988). "Early FlushA Decade of Women's Movement in India: Collection of Papers Presented at a Seminar Organized by Research Centre for Women's Studies, S.N.D.T. University, Bombay, coordinated by DesaiNeera. Bombay: Himalaya Publishing House". Contemporary Sociology: A Journal of Reviews (इंग्रजी भाषेत). 33 (6): 642–645. doi:10.1177/009430610403300605. ISSN 0094-3061.
- ^ Datar, Chhaya; Prakash, Aseem (September 2001). "Engendering Community Rights: A Case for Women's Access to Water and Wasteland". Indian Journal of Gender Studies. 8 (2): 223–246. doi:10.1177/097152150100800205.
- ^ Datar, Chhaya (2007). "Failure of National Rural Employment Guarantee Scheme in Maharashtra". Economic and Political Weekly. 42 (34): 3454–3457. JSTOR 4419939.
- ^ Datar, Chhaya (1999). "Non-Brahmin Renderings of Feminism in Maharashtra: Is It a More Emancipatory Force?". Economic and Political Weekly. 34 (41): 2964–2968. JSTOR 4408509.
- ^ "Diwali men's magazine invites contributions from women". Hindustan Times. 20 October 2011. 11 August 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 August 2018 रोजी पाहिले – HighBeam Research द्वारे.
- ^ "Chhaya Datar unveils her new book". Mumbai Live (इंग्रजी भाषेत). 2017. 2018-08-09 रोजी पाहिले.