छत्तीसगढ एक्सप्रेस
छत्तीसगढ एक्सप्रेस | |
---|---|
माहिती | |
चालक कंपनी | भारतीय रेल्वे |
मार्ग | |
सुरुवात | बिलासपूर, छत्तीसगढ |
शेवट | अमृतसर, पंजाब |
अप क्रमांक | १८२३७ |
निघायची वेळ (बिलासपूर, छत्तीसगढ) | १४.१५ |
पोचायची वेळ (अमृतसर, पंजाब) | ८.१० |
डाउन क्रमांक | १८२३८ |
निघायची वेळ (अमृतसर, पंजाब) | १६.१४ |
पोचायची वेळ (बिलासपूर, छत्तीसगढ) | १२.२० |
अंतर | २०११ किमी |
साधारण प्रवासवेळ | ४१ तास५५ मिनीटे |
प्रवासीसेवा | |
खानपान | उपलब्ध |
तांत्रिक माहिती | |
गेज | ब्रॉडगेज |
वेग | ४७ किमी/तास |
छत्तीसगढ एक्सप्रेस ही बिलासपूर आणि अमृतसर दरम्यान धावणारी एक जुनी भारतीय प्रवासी रेल्वेगाडी आहे. या गाडीला छत्तीसगढ या नव्याने स्थापन झालेल्या राज्याचे नाव दिले आहे. यापूर्वी १९७७ मध्ये 'छत्तीसगड ऑंचल एक्सप्रेस ही बिलासपूर आणि भेापाळमधील हबीबगंज दरम्यान धावत होती. [१] २०१९ साली नवीन बांधलेल्या भोपाळ हबीबगंज रेल्वे स्थानकामधून धावणारी ही पहिलीच गाडी आहे. १९८० मध्ये ती भोपाळ जंक्शन येथील मुख्य रेल्वे स्थानकापर्यंत जायला लागली. १९८७ नंतर ती हजरत निजामउद्दीन (दिल्ली) [२] तसेच नवी दिल्ली स्थानकांपर्यंत विस्तारली आणि शेवटी १९९० मध्ये ती अमृतसरपर्यंत जाऊ लागली.
मार्ग
महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश , उत्तर प्रदेश, दिल्ली, हरयाणा आणि पंजाब या राज्यांमधून ही गाडी धावते आणि २०११ किमी अंतर पार करते.[३] २५१ स्थानकांपैकी ८१ स्थानके खालीलप्रमाणे आहेत. [४]
- बीएसपी बिलासपूर रेल्वे स्थानक
- बीवायएल बेल्हा
- बीवायटी भातपारा
- एचएन हातबंध
- टीएलडी टील्डा
- आर रायपूर रेल्वे स्थानक
- बीपीएचबी भिलाई पॉवर हाउस
- डीयूआरजी दुर्ग जंक्शन
- आरजेएन राजनांदगांव
- डीजीजी डोंगरगड
- एसकेएस सालेकसा
- एजीएन आमगांव
- जी गोंदिया रेल्वे स्थानक
- टीआरओ तिरोरा
- टीएमआर तुमसर रोड
- बीआरडी भंडारा रोड
- केपी कांपटी
- एनजीपी नागपूर जंक्शन
- केएटीएल काटेाल
- एनआरकेआर नाखेर
- पीएआर पांढुर्णा
- एमटीवाय मुल्ताई
- एएमएलए अमला जंक्शन स्लीप- छिंदवाडा- अमृतसर छत्तीसगड एक्स्रपेस
- बीझेडयू बैतूल
- जीडीवायए घोराडोंगरी
- ईटी इटारसी जंक्शन
- एचबीडी होशंगाबाद
- ओडीजी भोपाळ ओबैदुल्ला गंज
- एमडीपी भोपाळ मंडीदीप
- एमआरडी भोपाळ मिसरोद
- एचबीजे भोपाळ हबीबगंज
- बीपीएल भोपाळ रेल्वे स्थानक
- बीएचएस विदिशा
- बीएक्यू गर्ज बसेादा
- एमएबीए मंडी भमोरा
- बीआयएनए बीना जंक्शन
- डीयूए ढौरा
- एलएआर ललितपूर
- बीझेडवाय वसाई
- बीएबी बबिना
- जेएचएस झॉंसी जंक्शन
- डीएए दातिआ
- एसओआर सोनगीर
- डीबीए डाबरा
- जीडब्ल्यूएल ग्वाल्हेर जंक्शन
- बीएओ बनमोर
- एमआरए मोरेना
- डीएचओ ढोलपूर जंकशन
- एजीसी आग्रा छावणी रेल्वे स्थानक
- आरकेएम राजा की मंडी
- एमटीजे मथुरा जंक्शन
- सीएचजे झाटा
- केएसव्ही कोसी कालान
- पीडब्ल्यूएल पालवाल
- बीव्हीएच वल्लभगड
- एफडीबी फरीदाबाद
- एनझेडएम दिल्ली हजरत निजामउद्दीन
- एसआरआर शाहिदाबाद जंक्शन
- जीझेडबी गाझियाबाद जंक्शन
- एमयूडी मुरादनगर
- एमडीएनआर मोदीनगर
- एमटीसी मीरत सिटी जंक्शन
- एमयूटी मीरत कॅन्टी.
- केएटी खटौली
- एमओझेड मुझफफरनगर
- डीबीडी देवबंद
- एसआरई सहारणपूर जंक्शन
- जेयूडी जगद्री
- जेयूडीडब्ल्यू जगद्री वर्कशॉप
- आरएए बरारा
- यूएमबी अंबाला कॅन्टॉन्मेन्ट जंक्शन
- यूबीसी अंबाला सिटी
- आरपीजे राजपूरा जंक्शन
- एसआयआर सिरहिंद जंक्शन
- जीव्हीजी मंडी गोविंदगड
- केएनएन खन्ना
- एलडीएच लुधियाना जंक्शन
- पीएचआर फिलौर जंक्शन
- पीजीडब्ल्यू फगवारा जंक्शन
- जेआरसी जालंधर कॅंटॉन्मेन्ट जंक्शन
- जेयूसी जालंधर सिटी जंक्शन
- केआरई कर्तारपूर
- बीईएएस बीस
- जेएनएल झंडिआला
- एएसआर अमृतसर जंक्शन
रेल्वेचा तपशील
१८२३७ क्रमांकाची गाडी विलासपूरवरून तर १८२३८ क्रमांकाची गाडी अमृतसरवरून रोज धावते. [५] [६] या गाडीला २४ डबे आहेत.
संदर्भ व नोंदी
- ^ "छत्तीसगड एक्सप्रेस धावणार रायपूर, बिलासपूर दरम्यान" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ^ हजरत निजामउद्दीन
- ^ छत्तीसगड एक्सप्रेस - सद्य स्थिती
- ^ "छत्तीसगड एक्सप्रेस - १८२३७". 2014-07-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-01-04 रोजी पाहिले.
- ^ छत्तीसगड एक्सप्रेस १८२३८ - रेल्वेमार्ग नकाशा
- ^ छत्तीसगड एक्सप्रेस १८२३७ - रेल्वेमार्ग नकाशा