च्यांग झमिन
- हे चिनी नाव असून, आडनाव च्यांग असे आहे.
च्यांग झमिन (मराठी लेखनभेद: च्यांग झ-मिन, ज्यांग झेमिन, जियांग झेमिन ; चिनी: 江泽民 ; फीनयीन: Jiang Zemin ; ) (ऑगस्ट १७, इ.स. १९२६; यांग्चौ, च्यांग्सू - नोव्हेंबर ३०, इ.स. २०२२) हा चिनी साम्यवादी पक्षातील "तिसऱ्या पिढीतला" आघाडीचा राजकारणी होता. तो इ.स. १९९३ ते इ.स. २००३ या कालखंडात चिनाच्या जनता-प्रजासत्ताकाचा राष्ट्राध्यक्ष होता. त्याआधी इ.स. १९८९ ते इ.स. २००२ या काळात तो चिनी साम्यवादी पक्षाचा सर्वसाधारण सचिव होता.