Jump to content

चौथे चिमणराव (पुस्तक)

चौथे चिमणराव
लेखकचिं.वि. जोशी
भाषामराठी
साहित्य प्रकारकथासंग्रह
प्रकाशन संस्थाकॉंटिनेंटल
प्रथमावृत्ती१९५८
चालू आवृत्ती२०००
पृष्ठसंख्या१५१

चौथे चिमणराव हा मराठी लेखक चिं.वि. जोशी यांनी लिहिलेला कथासंग्रह आहे. हे पुस्तक १९५८ साली प्रसिद्ध झाले. हे पुस्तक कथासंग्रह असले तरी या पुस्तकात सुरुवातीला प्रल्हाद केशव अत्रे यांनी चिं.वि. जोशी यांची ओळख करून देणारा लेख लिहला आहे. तसेच चिं.वि. जोशी यांनीही त्यांच्या चिमणराव या पात्राच्या निर्मितीबद्दल व आपल्या लेखक होण्यास कारणीभूत ठरलेल्या बाबींबद्दल एक लेख लिहला आहे.

अर्पणपत्रिका

चिं.वि. जोशी यांनी हे पुस्तक प्रल्हाद केशव अत्रे यांना अर्पण केले आहे. अर्पण पत्रिका पुढीलप्रमाणे आहे-

"महाराष्ट्रीय विनोद
ज्यांनी कथा व निबंध वाङमयांतून बाहेर काढून
नाट्य, बोलपट, व्यासपीठ, काव्य व वृत्तसृष्टी
या भिन्न क्षेत्रांत खेळविला
ते माझे प्रिय मित्र
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे
यांस सप्रेम"

लेखसूची

या कथासंग्रहात एकूण १३ कथा आहेत. त्यांची अनुक्रमे सूची पुढीलप्रमाणे-

१. विनोद चिंतामणी - प्र.के. अत्रे
२. आमचे मानस-पुत्र चिमणराव
३. जुने ते सोने
४. सुधारलेला सासूरवास
५. सौजन्यसप्ताह
६. शिकवणी
७. माझी पीएच.डी. का हुकली?
८. आईची काशीयात्रा
९. कालाय तस्मै नमः
१०. टिटो आणि भटो
११. चिमणराव ज्ञानेश्वरी वाचतात
१२. पुरोगामित्वाच्या मर्यादा
१३. रविवारी चिमणरावचिमणराव