चौगाव
?चौगाव महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | धुळे |
प्रांत | महाराष्ट्र |
विभाग | नाशिक विभाग |
जिल्हा | धुळे |
तालुका/के | धुळे |
लोकसंख्या लिंग गुणोत्तर साक्षरता • पुरूष • स्त्री | ३,९१९ (२००१) ९०६ ♂/♀ ७० % • ४० % • ३० % |
भाषा | मराठी |
चौगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील, धुळे जिल्ह्यातल्या धुळे तालुक्यात वसलेले एक गाव आहे.
स्थान
चौगाव हे महाराष्ट्र राज्य महामार्ग १०वर () 20°52′N 74°35′E / 20.87°N 74.58°E या अक्षांश रेखांशावर आहे. धुळे शहरापासून चौगाव येथे पोहचण्याकरिता राष्ट्रीय महामार्ग ६ ने १८.७ किमी (११.६ मैल) पश्चिमेकडे असलेल्या कुसुंबा गांवाला जावे लागते. गांवात शिरल्यावर तिथून महाराष्ट्र राज्य महामार्ग १० ()ने दक्षिणेकडे ५ किमी (३ मैल) गेल्यावर महाराष्ट्र राज्य ग्रामीणमार्ग क्रमांक १३८ (VR 138)चा चौक लागतो. चौगाव गांव तेथून पश्चिमेला ३०० मीटरवर आहे.
लोकसंख्येचा तपशील
२००१ च्या जनगणनेनुसार, चौगावात १,९५४ पुरुष आणि १,९६५ महिला मिळून ३,९१९ लोकसंख्या होते. पुरुष आणि महिलांची लोकसंख्या ५१% आणि ४९% आहे. चौगावचा सरासरी साक्षरता दर ७०%, जो राष्ट्रीय साक्षरता दर ५९.५% पेक्षा अधिक आहे. पुरुषसाक्षरता ४०% आहे आणि महिला साक्षरता ३०% आहे. चौगाव मध्ये, केवळ १% लोकसंख्या ६ वर्ष पेक्षा कमी आहे. चौगावचा सरासरी जन्म दर १८.८४% आणि मृत्यु दर ६.०२% एवढा आहे.[१] या गावात ९८० परिवार राहतात व गावाचे सीमा क्षेत्र के एकूण २,९११ हेक्टर एवढे पसरले आहे.
अर्थव्यवस्था
चौगाव एक कृषि अर्थव्यवस्था आहे, पारंपरिक पिके बाजरी, कापूस, भुईमूग, ज्वारी, कांदा और गहू यांचा समावेश आहे, शेतबांधावर काहीप्रमाणात नारळाची झाडे आढळतात.शेतकरी नदी व पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात. प्रगत कृषि तंत्रात सुधारीत बियाणे, ठिबक सिंचन, रासायनिक तसेच जैव खते यांचा उपयोग केला जातो आहे.मागच्या काही वर्षा पासून सिताफळ,डाळींब,पपई इत्यादीच्या रूपाने फळबागाईतीचे प्रमाण वाढत आहे. राज्याच्या आर्थिक उत्पन्न आणि खर्चात शेती अर्थव्यवस्थेचा समावेश होतो.अंदाज पत्रकीय वर्ष २००७-२००८ करिता चौगाव उत्पन्न रुपये २,२३२,१६७/- एवढे तर खर्च रुपये १,९२०,०००/- एवढा गृहीत धरला होता.
प्रशासन
चौगावला दैनंदिन प्रशासनाकरिता ग्रामपंचायत आहे. जिल्हा पंचायत मुख्यालय आणि ब्लॉक पंचायत दोन्हीही धुळे येथे आहेत.
चौगावात कोणतीही व्यावसायिक अथवा सहकारी बँक, किंवा शेतकी/बिगर शेतकी क्रेडिट सोसायटी नाही.
पिण्याच्या पाण्याच्या सुविधा
चौगावात पिण्याच्या पाण्याच्या बऱ्याच सार्वजनिक नळ आणि सार्वजनिक विहिरी आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी पाच विहिरी, दोन हात पंप आणि दोन वीज पंप आहेत.
शैक्षणिक सुविधा
चौगावात एक प्राथमिक विद्यालय आणि एक माध्यमिक विद्यालय आहे. सर्व उच्च शिक्षणाकरिता गावातील विद्यार्थ्यांना नजीकच्या मोठ्या शहरात जावे लागते.
याशिवाय चौगावात, भारत सरकारच्या, बाल कुपोषण विरोधात १९७५ मध्ये सुरू केलेल्या, बाल विकास सेवा कार्यक्रमातर्गत, सरकारी अनुदान घेणारी ३२ माता आणि बालसंगोपन (अंगणवाडी) केंद्रे आहेत.
आरोग्यसुविधा
चौगावात कोणतीही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाही.
संचारसुविधा
चौगावात पोस्ट ऑफीस आहे, परंतु गावात तार अथवा टेलिफोनची सोय नाही.
मनोरंजन व सांस्कृतिक सुविधा
चौगाव गावात सिनेमा अथवा व्हीडियो हॉलसारखी मनोरंजन सुविधा उपलब्ध नाही. गावात स्पोर्ट क्लब, स्टेडियम,सांस्कृतिक केंद्र इत्यादी उपलब्ध नाही. गावकरी दिवाळीच्या सणात खुल्या मैदानात हेल्याची (रेड्याची) टक्कर पहाण्यास मोठ्या प्रमाणात जमा होतात. तसेच ते भवानी मातेच्या यात्रा उत्साहात लोकनाट्ये (तमाशा) बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.
दुधाकरिता म्हैसपालन हा शेतीस प्रमुख जोड धंदा असल्यामुळे, शेतकरी अशा टक्करीत सहभागी होतील असे हेले बाळगून त्यांच्या विशेष पोषणाची काळजी घेतात.
चौगाव गावात विविध जाती-जमातीचे लोक रहातात, त्यांत प्रामूख्याने माळी, सुतार, गवळी, भिल, कोळी, शिंपी, हरिजन, इत्यादी आहेत.
दळणवळणाची साधने
रेल्वे
चौगावात रेल्व नाही. सर्वाधिक जवळचे रेल्वेस्थानक २० किमी अंतरावर धुळे शहरात आहे.
रस्ते
चौगाव हे धुळे, कुसुंबा आणि मालेगांव येथून येजा करणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी.बसेसने जोडलेले आहे.
हवाई वाहतूक
चौगावात विमानतळ नाही. सर्वाधिक जवळचा विमानतळ धुळे येथे आहे.
हे सुद्धा पहा
- धुळे शहर
- धुळे जिल्हा
- धुळे जिल्ह्यातील गावे
- महाराष्ट्रातील जिल्हे
- महाराष्ट्र
बाह्य दुवे
- भारतीय जणगणना: २००१: गाव क्र्मांक ००१५७८००ची लोकसंख्या
- भारत सरकार: पंचायती राज मंत्रालय Archived 2007-03-29 at the Wayback Machine.
संदर्भ
- ^ "भारत सरकार: पंचायती राज मंत्रालय - चौगाव ग्रामपंचायत - लोकसंख्येचा तपशील". 2016-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-10-05 रोजी पाहिले.