चोळी
चोळी हा भारतीय उपखंडात प्रचलित असलेला व सहसा साडीसोबत ल्यायला जाणारा स्त्रियांच्या पोशाखातील प्रकारविशेष आहे. चोळी स्त्रीच्या स्तनांना व सहसा पाठीच्या वरच्या भागासही झाकेल, परंतु पोट व पाठीचा मध्यभाग अनावृत राहतील, अश्या पद्धतीने बेतलेली असते. हातांतून घालण्यासाठी हिला बाह्या शिवण्यात येतात.
स्थानपरत्वे प्रकारविशेष
महाराष्ट्रीय पद्धतीची चोळी
मराठी समाजात लहान मुलींनी परकर-चोळी घालायची रीत होती [१]. बायका नऊवारी साडीसोबत कोपरपर्यंत बाह्या असलेली, रोमन लिपीतील व्ही अक्षरासारखा गळा असलेली व स्तनांच्या मधोमध गाठ मारण्याजोगी खणाची चोळी घालत [१].
संदर्भ व नोंदी
- ^ a b गोरे,रेखा. ""पदरावरती जरतारीचा" - साडी-चोळी पेहरण्याच्य पारंपरिक पद्धतींविषयी माहिती". 2016-03-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ७ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत