चोलुतेका
हा लेख होन्डुरासमधील शहर चोलुतेका याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, चोलुतेका (निःसंदिग्धीकरण).
चोलुतेका होन्डुरासच्या याच नावाच्या प्रांताच्या राजधानीचे शहर आहे. हे शहर चोलुतेका नदीकिनारी वसलेले असून पॅन अमेरिकन महामार्गावरील महत्त्वाचे ठिकाण आहे. अंदाजे एक लाख वस्ती असलेल्या या शहरात मोठे बस स्थानक असन तेथून मोठ्या संख्येने प्रवासी होन्डुरास तसेच शेजारी देशांत प्रवास करतात.
या शहराच्या ठिकाणी इ.स. १५४५ पासून वस्ती आहे. तेव्हा त्यास व्हिया दि हेरेझ दि चोलुतेका असे नाव होते. इ.स. १८४५मध्ये यास शहराचा दर्जा देण्यात आला.