चोपदार
चोपदार म्हणजे राजदरबारातील मानकरी,देवीला प्रत्येक वेळी मानाने आरोळी देऊन बोलावले जाते.तीच ललकारी देण्यासाठी चोपदार या मानकऱ्याची नियुक्ती केलेली असते.चोपदाराचा विशिष्ट लाल रंगाचा अंगरखा आणि पायजमा असतो.त्यांवर शेला असतो.तसेच पोशाखाच्या छातीवर त्या संस्थानचे पदक असते. तसेच संस्थानचा सोन्याचा राजदंड/मानदंड असतो.तो राजदंड ह्या चोपदार कडे असतो.करवीर निवासिनी अंबाबाईचा सोन्याने मढवलेला राजदंड आहे.असा हा राजदंड घेऊन ललकारी देण्यासाठी नेमलेला मानाचा मानकरी होय.