चैतन्य ताम्हाणे
भारतीय चित्रपट निर्माता (जन्म १९८७) | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | मार्च १, इ.स. १९८७ मुंबई | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय |
| ||
| |||
चैतन्य ताम्हाणे (जन्म १ मार्च १९८७) हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक आहेत.[१]
सुरुवातीचे आयुष्य
चैतन्य ताम्हाणे ह्यांचा जन्म १ मार्च १९८७ रोजी मुंबई येथे झाला. त्यांनी मुंबईतील मिठीबाई कॉलेजमधून साहित्यामध्ये पदवी घेतली. त्यांची आई ह्या रेल्वेतील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत आणि वडील पर्यावरण विषयातील सल्लागार आहेत.
कारकीर्द
त्यांचा २०१४ सालचा, कोर्ट हा मराठी भाषेतील चित्रपट प्रसिद्ध झाला. ह्या चित्रपटाला ३० अंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. ह्या चित्रपटाला ८८व्या अकादमी पुरस्कारासाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट ह्या निकषावर निवडले गेले. ह्या चित्रपटामध्ये भारतीय न्यायव्यवस्थेचा अभ्यास केला आहे. ताम्हाणे ह्यांनी दिग्दर्शित केलेला दुसरा चित्रपट द डीसायपल हा चित्रपट ७७व्या व्हेनिस इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये चित्रित करण्यात आला. ह्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लेखनासाठी पुरस्कार मिळाला.
दिग्दर्शित चित्रपट
- सिक्स स्ट्रँड्स (२०११) [लघुपट]
- कोर्ट (२०१४)
- डेथ ऑफ अ फादर (२०१४) [लघुपट]
- द डीसायपल (२०२०)
संदर्भ
- ^ "Chaitanya Tamhane". IMDb. 2021-05-11 रोजी पाहिले.