चेंडू फूल
चेंडूफळ(Parkia biglandulosa) चेंडू फळ या वृक्षला चेंडू फुल असेही म्हणतात .एक उंच वाढणारा डेरेदार पर्णसंभार असलेला सदाहरित वृक्ष. हा वृक्ष आकारमानाने गुलमोहर पेक्षा बराच उंच आणि मोठया विस्ताराचा असतो.डिसेंबर-जानेवारी महिन्यात हे झाड लांब देठावर लोंबकळणाऱ्या गोल्फ चेंडूच्या आकाराच्या फुलांनी बहरते. फुले चेंडूच्या आकाराच्या गोलावर उगवत असल्याने चेंडूफुल हे नाव आले. बऱ्याचदा या वृक्षाला चेंडूफळाचा वृक्ष असे संबोधले जाते. पण हे सयुत्तिक नाही,कारण या फळांचा आकार चेंडूसारखा नसतो. फळे म्हणजे चपटया शेंगा असतात.त्यामुळे चेंडू फुल म्हणणे योग्य आहे. ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात दीड हात लांबीच्या जाड दांडीच्या टोकावर तपकिरी रंगाचे लहान चेंडू दिसू लागतात आणि काही दिवसात संपूर्ण चेंडू झाड बारीक –बारीक पांढऱ्या फुलांनी भरून जातो.चेंडूच्या उगवलेली पांढरी फुले अतिशय लहान असल्याने लांबून फुलांचा चेंडू रव्याच्या लाडू सारखा दिसतो.फुले गळून गेल्यावर कधी कधी आतला टनक चेंडू वरच्या दाडीसारखा खाली गळून पडतो. मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात,भायखळ्यातील वीर जिजामाता उद्यान,कुलब्यातील सागर उद्यानांत,साठे महाविद्यालय(पार्ले, पूर्व) यांच्या प्रांगणात व वांद्र (पूर्व) हनुमान मंदिरासमोर चेंडूफुलाचे काही मोठे वृक्ष आहेत.
संदर्भ
वृक्ष राजी मुंबईची
प्रकाशक:मुग्धा कर्णिक
लेखक:सुशील शिंदे