Jump to content

चॅपेल-हॅडली चषक

चॅपेल-हॅडली चषक
आयोजकआंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती
प्रकार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने
प्रथम२००४-०५
शेवटची२०१६-१७
स्पर्धा प्रकार मालिका
संघ
सद्य विजेतान्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
यशस्वी संघऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (५)
सर्वाधिक धावान्यूझीलंड ब्रॅंडन मॅककुलम (८०९)
ऑस्ट्रेलिया मायकल हसी (७३६)
ऑस्ट्रेलिया ब्रॅड हॅडीन (६९२) []
सर्वाधिक बळीऑस्ट्रेलिया मिचेल जॉन्सन (२६)
न्यूझीलंड ट्रेंट बोल्ट (२३)
न्यूझीलंड डॅनिएल व्हेट्टोरी (२२)[]

चॅपेल-हॅडली चषक ही ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड संघांदरम्यान खेळवली जाणारी एकदिवसीय मालिका आहे. ऑस्ट्रेलियाचे चॅपेल बंधू (इयान, ग्रेगरी आणि ट्रेव्हर) आणि न्यू झीलंडचे वॉल्टर हॅडली आणि त्यांची तीन मुले (बॅरी, डेल आणि सर रिचर्ड) ह्या दोन देशांच्या प्रख्यात कुटुंबांच्या नावावरून सदर मालिकेला नाव दिले गेले आहे.

चॅपेल-हॅडली चषक, २०१६ मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियाला २-१ असे पराभूत केल्यानंतर, सध्या हा चषक न्यू झीलंडकडे आहे.[]२०१५ क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यात हे दोन्ही संघ आमने-सामने आले होते, तो सामना चॅपेल-हॅडली चषकासाठी विचारात घेतला गेला नाही (परंतू, गट फेरीतील सामना ग्राह्य धरला गेला आणि त्यामुळे २०१४-१५ चषकाचा विजेता सुद्धा न्यू झीलंड संघ ठरला).[] ह्याआधी, २००७-०८ पासून सदर चषक सतत ऑस्ट्रेलियाकडेच होता.[] ऑस्ट्रेलियाने पाच तर न्यू झीलंडने आतापर्यंतर चार मालिका जिंकल्या आहेत.[]

२००४-०५ पासून २००९-१० पर्यंत चषकासाठी दर वर्षी तीन किंवा पाच सामन्यांची मालिका होत असे आणि २०१०-११ आणि २०१४-१५ विश्वचषकादरम्यान एका सामन्यांच्या मालिकेची नोंद केली गेली. परंतु सध्या सदर मालिका ही वार्षिक स्पर्धा राहिलेली नाही. क्रिकेट विश्वचषक, २०१५ - अंतिम सामना हा ह्या दोन संघांदरम्यान खेळवला गेला, परंतु तो सामना ह्या चषकासाठी ग्राह्य धरला गेला नाही.[] २०१७-१८ मोसमातील मालिकेऐवजी ट्रान्स-टस्मान त्रिकोणी मालिका, २०१७-१८ खेळवण्यात येईल, परंतु २०१८-१९ मधील न्यू झीलंड मधील मालिका अपेक्षेप्रमाणे खेळवण्यात येईल.[]

इतिहास

३ डिसेंबर २००५ च्या चॅपेल-हॅडली चषक सामन्यातील चित्र

चॅपेल-हॅडली चषक सामन्यांनी अनेक लक्षणीय निकाल आणि विक्रम मोडताना पाहिले आहेत:

  • न्यू झीलंडने चॅपेल-हॅडली चषक सामन्यांमध्ये तीन सर्वात मोठ्या धावसंख्यांचा यशस्वी पाठलाग केला आहे. २००५-०६ च्या मालिकेमध्ये ख्राईस्टचर्च येथील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ३३२ धावांचा यशस्वी पाठलाग करून एकदिवसीय इतिहासातील सर्वात मोठ्या यशस्वी पाठलागाचा विक्रम स्थापित केला;[] तो नंतर दक्षिण आफ्रिकेने २००५-०६ च्या मोसमात मोडला होता. त्यानंतर २००६-०७ च्या मालिकेमध्ये, न्यू झीलंडने ऑकलंड येथील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ३३६ तर हॅमिल्टन येथील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ३४६ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. सध्या हे विक्रम एकदिवसीय इतिहासात यशस्वी पाठलागांच्या यादीत पहिल्या दहा मध्ये आहेत.[१०]
  • २००६-०७ च्या वेलिंग्टन येथील पहिल्या एकदिवसीय सामन्यात, ऑस्ट्रेलियाला एकदिवसीय इतिहासात पहिल्यांदाच १० गड्यांनी पराभव पत्करावा लागला होता. तो ऑस्ट्रेलियाचा ६४६वा एकदिवसीय सामना होता.[११]
  • २००६-०७ मध्ये ऑकलंड येथील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर ऑस्ट्रेलियाला आयसीसी एकदिवसीय अजिंक्यपद स्पर्धेचे ऑक्टोबर २००२ मध्ये क्रमवारी अस्तित्वात आल्यानंतर मिळालेले अव्वल स्थान ५२ महिन्यांत पहिल्यांदाच गमवावे लागले.[१२]
  • २००६-०७ मधील हॅमिल्टन येथील एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना मॅथ्यू हेडनने नाबाद १८१ धावा करून ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजातर्फे सर्वोच्च वैयक्तिक धावांचा नवीन विक्रम प्रस्थापित केला,[१३] जो २०११ पर्यंत अबाधित होता. दुसऱ्या डावात क्रेग मॅकमिलनने ६७ चेंडूंमध्ये झंझावाती शतक ठोकले, हा न्यू झीलंड फलंदाजातर्फे एकदिवसीय सामन्यातील सर्वात जलद शतकाचा विक्रम होता.[१३] १ जानेवारी २०१४ रोजी कोरे अँडरसन (३६ चेंडूंत) आणि जेसी रायडर (४६ चेंडूंत) ह्या दोघांनी वेस्ट इंडीज विरुद्ध क्वीन्सटाऊन येथे हा विक्रम मोडला.

एकूण सांख्यिकी

मालिका

मालिकाऑस्ट्रेलियान्यू झीलंडबरोबरी
१३

सामने

सामनेऑस्ट्रेलियान्यू झीलंडबरोबरी / अनिर्णित
३५१९१४

मालिका निकाल

मोसमयजमाननिकालमालिकावीरक्रिकइन्फो पान
२००४-०५ऑस्ट्रेलियामालिका बरोबरीत १-१डॅनिएल व्हेट्टोरी[१]
२००५-०६न्यू झीलंडऑस्ट्रेलिया विजयी २-१स्टुअर्ट क्लार्क[२]
२००६-०७न्यू झीलंडन्यू झीलंड विजयी ३-०शेन बॉंड[३]
२००७-०८ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया विजयी २–०रिकी पॉंटिंग[४]
२००८-०९ऑस्ट्रेलियामालिका बरोबरीत २-२मायकल हसी[५]
२००९-१०न्यू झीलंडऑस्ट्रेलिया विजयी ३–२मिचेल जॉन्सन/स्कॉट स्टायरिस[६]
२०११भारत[१४]ऑस्ट्रेलिया विजयी १–०मिचेल जॉन्सन*[७]
२०१५न्यू झीलंडन्यू झीलंड विजयी १–०ट्रेंट बोल्ट*[८]
२०१५-१६न्यू झीलंडन्यू झीलंड विजयी २–१मार्टिन गुप्टिल[९]
२०१६-१७ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया विजयी ३–०डेव्हिड वॉर्नर[१०]
२०१६-१७न्यू झीलंडन्यू झीलंड विजयी २–०N/A[११]
२०१९-२०ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया विजयी १–०मिचेल मार्श[१२]
२०२२-२३ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया विजयी ३–०स्टीव्ह स्मिथ[१३]

*एकमेव एकदिवसीय सामन्यात सामनावीर पुरस्कार

मालिका

२००४-०५ मालिका, ऑस्ट्रेलिया

चॅपेल-हॅडली चषक, २००४-०५. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका निकाल: मालिका बरोबरीत १-१.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक ऑस्ट्रेलिया कर्णधार न्यू झीलंड कर्णधार स्थळ निकाल
ए.दि. २१९६५ डिसेंबर २००४रिकी पॉंटिंगस्टीफन फ्लेमिंगडॉकलॅंड्स स्टेडियम, मेलबर्नन्यू झीलंड ४ गडी राखून
ए.दि. २१९८८ डिसेंबर २००४रिकी पॉंटिंगस्टीफन फ्लेमिंगसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीऑस्ट्रेलिया १७ धावांनी
ए.दि. २१९८अ१० डिसेंबर २००४रिकी पॉंटिंगस्टीफन फ्लेमिंगद गब्बा, ब्रिस्बेनरद्द (पाऊस)

२००५-०६ मालिका, न्यू झीलंड

चॅपेल-हॅडली चषक, २००५-०६. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका निकाल: ऑस्ट्रेलिया विजयी २–१.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक न्यू झीलंड कर्णधार ऑस्ट्रेलिया कर्णधार स्थळ निकाल
ए.दि. २३०१३ डिसेंबर २००५डॅनिएल व्हेट्टोरीरिकी पॉंटिंगइडन पार्क, ऑकलंडऑस्ट्रेलिया १४७ धावांनी
ए.दि. २३०२७ डिसेंबर २००५डॅनिएल व्हेट्टोरीरिकी पॉंटिंगवेस्टपॅक मैदान, वेलिंग्टनऑस्ट्रेलिया २ धावांनी
ए.दि. २३०३१० डिसेंबर २००५डॅनिएल व्हेट्टोरीरिकी पॉंटिंगजेड मैदान, ख्राईस्टचर्चन्यू झीलंड २ गडी राखून

२००६-०७ मालिका, न्यू झीलंड

चॅपेल-हॅडली चषक, २००६-०७. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका निकाल: न्यू झीलंड विजयी ३-०

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक न्यू झीलंड कर्णधार ऑस्ट्रेलिया कर्णधार स्थळ निकाल
ए. दि. २५२४१६ फेब्रुवारी २००७स्टीफन फ्लेमिंगमायकल हसीवेस्टपॅक मैदान, वेलिंग्टनन्यू झीलंड १० गडी राखून
ए. दि. २५२६१८ फेब्रुवारी २००७स्टीफन फ्लेमिंगमायकल हसीइडन पार्क, ऑकलंडन्यू झीलंड ५ गडी राखून
ए. दि. २५२७२० फेब्रुवारी २००७स्टीफन फ्लेमिंगमायकल हसीसेडन पार्क, हॅमिल्टनन्यू झीलंड १ गडी राखून

२००७-०८ मालिका, ऑस्ट्रेलिया

चॅपेल-हॅडली चषक, २००७-०८. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका निकाल: ऑस्ट्रेलिया विजयी २-०.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक न्यू झीलंड कर्णधार ऑस्ट्रेलिया कर्णधार स्थळ निकाल
ए. दि. २६५५१४ डिसेंबर २००७डॅनिएल व्हेट्टोरीरिकी पॉंटिंगॲडलेड ओव्हल, ॲडलेडऑस्ट्रेलिया ७ गडी राखून
ए. दि. २६५६१६ डिसेंबर २००७डॅनिएल व्हेट्टोरीरिकी पॉंटिंगसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीअनिर्णित (पाऊस)
ए. दि. २६५७२० डिसेंबर २००७डॅनिएल व्हेट्टोरीरिकी पॉंटिंगबेलेराइव्ह ओव्हल, होबार्टऑस्ट्रेलिया १२० धावांनी

२००८-०९ मालिका, ऑस्ट्रेलिया

चॅपेल-हॅडली चषक, २००८-०९. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका निकाल: २-२ बरोबरीनंतर चषक ऑस्ट्रेलियाकडेच राहिला.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक न्यू झीलंड कर्णधार ऑस्ट्रेलिया कर्णधार स्थळ निकाल
ए. दि. २८१११ फेब्रुवारी २००९डॅनिएल व्हेट्टोरीरिकी पॉंटिंगवाका मैदान, पर्थन्यू झीलंड २ गडी राखून
ए. दि. २८१६६ फेब्रुवारी २००९डॅनिएल व्हेट्टोरीमायकेल क्लार्कमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नन्यू झीलंड ६ गडी राखून
ए. दि. २८१७८ फेब्रुवारी २००९डॅनिएल व्हेट्टोरीरिकी पॉंटिंगसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीऑस्ट्रेलिया ३२ धावांनी
ए. दि. २८१९११ फेब्रुवारी २००९डॅनिएल व्हेट्टोरीरिकी पॉंटिंगॲडलेड ओव्हल, ॲडलेडऑस्ट्रेलिया ६ गडी राखून
ए. दि. २८२०१३ फेब्रुवारी २००९डॅनिएल व्हेट्टोरीरिकी पॉंटिंगद गब्बा, ब्रिस्बेनअनिर्णित (पाऊस)

२००९-१० मालिका, न्यू झीलंड

चॅपेल-हॅडली चषक, २००९-१०. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका निकाल: ऑस्ट्रेलिया विजयी ३–२.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक न्यू झीलंड कर्णधार ऑस्ट्रेलिया कर्णधार सामनावीर स्थळ निकाल
ए. दि. २९६६३ मार्च २०१०रॉस टेलररिकी पॉंटिंगरॉस टेलरमॅकलीन पार्क, नेपियरन्यू झीलंड २ गडी राखून
ए. दि. २९६९६ मार्च २०१०डॅनिएल व्हेट्टोरीरिकी पॉंटिंगडॅनिएल व्हेट्टोरीइडन पार्क, ऑकलंडऑस्ट्रेलिया १२ धावांनी
ए. दि. २९७१९ मार्च २०१०डॅनिएल व्हेट्टोरीरिकी पॉंटिंगब्रॅड हॅडिनसेडन पार्क, हॅमिल्टनऑस्ट्रेलिया ६ गडी राखून
ए. दि. २९७३११ मार्च २०१०डॅनिएल व्हेट्टोरीरिकी पॉंटिंगकॅमेरोन व्हाइटइडन पार्क, ऑकलंडऑस्ट्रेलिया ६ गडी राखून
ए. दि. २९७५१३ मार्च २०१०डॅनिएल व्हेट्टोरीरिकी पॉंटिंगटीम साऊथीवेस्टपॅक मैदान, वेलिंग्टनन्यू झीलंड ५१ धावांनी

२०१०-११ मालिका, भारत (विश्वचषक २०११)

२०१०-११ च्या मोसमात ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड संघ फक्त एका एकदिवसीय सामन्यासाठी आमने-सामने आले ते १२ फेब्रुवारी २०११ रोजी नागपूर, भारत येथे खेळवल्या गेलेल्या क्रिकेट विश्वचषक, २०११च्या गट फेरी दरम्यान झालेल्या सामन्यात. त्यामुळे दोन्ही देशांनी सदर सामन्यात चॅपेल-हॅडली चषकासाठी लढत देण्याचे ठरवले. ऑस्ट्रेलियाने सामना ७ गडी राखून जिंकला.[१४]

चॅपेल-हॅडली चषक, २०१०-११. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका निकाल: ऑस्ट्रेलिया विजयी १–०.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक न्यू झीलंड कर्णधार ऑस्ट्रेलिया कर्णधार सामनावीर स्थळ निकाल
ए. दि. ३१०७२५ फेब्रुवारी २०११डॅनिएल व्हेट्टोरीरिकी पॉंटिंगमिचेल जॉन्सनविदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूरऑस्ट्रेलिया ७ गडी राखून

२०१४-१५ मालिका, न्यू झीलंड (विश्वचषक २०१५)

२०१४-१५ च्या मोसमात सुद्धा ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड संघ फक्त एका एकदिवसीय सामन्यासाठी २८ फेब्रुवारी २०१५ रोजी ऑकलंड, न्यू झीलंड येथे खेळवल्या गेलेल्या क्रिकेट विश्वचषक, २०१५च्या गट फेरी दरम्यान झालेल्या सामन्यात आमने-सामने आले. त्यामुळे दोन्ही देशांनी सदर सामन्यात चॅपेल-हॅडली चषकासाठी लढत देण्याचे ठरवले. न्यू झीलंडने सामना १ गडी राखून जिंकला.

चॅपेल-हॅडली चषक २०१४-१५. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका निकाल: न्यू झीलंड विजयी १-०.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक न्यू झीलंड कर्णधार ऑस्ट्रेलिया कर्णधार सामनावीर स्थळ निकाल
ए. दि. ३६१७२८ फेब्रुवारी २०१५ब्रॅंडन मॅककुलममायकेल क्लार्कट्रेंट बोल्टइडन पार्क, ऑकलंडन्यू झीलंड १ गडी राखून

२०१५-१६ मालिका, न्यू झीलंड

चॅपेल-हॅडली चषक, २०१५-१६. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका निकाल: न्यू झीलंड विजयी २–१.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक न्यू झीलंड कर्णधार ऑस्ट्रेलिया कर्णधार सामनावीर स्थळ निकाल
ए. दि. ३७३१३ फेब्रुवारी २०१६ब्रॅंडन मॅककुलमस्टीव्ह स्मिथमार्टीन गुप्टिलइडन पार्क, ऑकलंडन्यू झीलंड १५९ धावांनी
ए. दि. ३७३३६ फेब्रुवारी २०१६ब्रॅंडन मॅककुलमस्टीव्ह स्मिथमिचेल मार्शवेस्टपॅक मैदान, वेलिंग्टनऑस्ट्रेलिया ४ गडी राखून
ए. दि. ३७३५८ फेब्रुवारी २०१६ब्रॅंडन मॅककुलमस्टीव्ह स्मिथइश सोढीसेडन पार्क, हॅमिल्टनन्यू झीलंड ५५ धावांनी

२०१६-१७ मालिका, ऑस्ट्रेलिया

चॅपेल-हॅडली चषक, २०१६-१७. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका निकाल: ऑस्ट्रेलिया विजयी ३–०.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक न्यू झीलंड कर्णधार ऑस्ट्रेलिया कर्णधार सामनावीर स्थळ निकाल
ए.दि. ३८११४ डिसेंबरस्टीव्ह स्मिथकेन विल्यमसनस्टीव्ह स्मिथसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६८ धावांनी
ए.दि. ३८१२६ डिसेंबरस्टीव्ह स्मिथकेन विल्यमसनडेव्हिड वॉर्नरमानुका ओव्हल, कॅनबेराऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ११६ धावांनी
ए.दि. ३८१३९ डिसेंबरस्टीव्ह स्मिथकेन विल्यमसनडेव्हिड वॉर्नरमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ११७ धावांनी

२०१६-१७ मालिका, न्यू झीलंड

चॅपेल-हॅडली चषक, २०१६-१७. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका निकाल: न्यू झीलंड विजयी २–०.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक न्यू झीलंड कर्णधार ऑस्ट्रेलिया कर्णधार सामनावीर स्थळ निकाल
ए.दि. ३८२९३० जानेवारीकेन विल्यमसनॲरन फिंचमार्कस स्टोइनिस (ऑ)इडन पार्क, ऑकलंडन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ६ धावांनी
ए.दि. ३८३०अ२ फेब्रुवारीकेन विल्यमसनॲरन फिंचमॅकलीन पार्क, नेपियरसामना रद्द
ए.दि. ३८३२५ फेब्रुवारीकेन विल्यमसनॲरन फिंचट्रेंट बोल्ट (न्यू)सेडन पार्क, हॅमिल्टनन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २४ धावांनी

२०१९-२० मालिका, ऑस्ट्रेलिया

चॅपेल-हॅडली चषक - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार सामनावीर स्थळ निकाल
१ला ए.दि.१३ मार्चॲरन फिंचटॉम लॅथममिचेल मार्शसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७१ धावांनी
२रा ए.दि.१५ मार्चॲरन फिंचटॉम लॅथमसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीसामना रद्द
३रा ए.दि.२० मार्चॲरन फिंचटॉम लॅथमबेलेराइव्ह ओव्हल, होबार्टसामना रद्द

२०२२-२३ मालिका, ऑस्ट्रेलिया

चॅपेल-हॅडली चषक - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार सामनावीर स्थळ निकाल
१ला ए.दि.६ सप्टेंबर २०२२ॲरन फिंचकेन विल्यमसनकॅमेरॉन ग्रीनकॅझलीज स्टेडियम, केर्न्सऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २ गडी राखून
२रा ए.दि.८ सप्टेंबर २०२२ॲरन फिंचकेन विल्यमसनमिचेल स्टार्ककॅझलीज स्टेडियम, केर्न्सऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ११३ धावांनी
३रा ए.दि.११ सप्टेंबर २०२२ॲरन फिंचकेन विल्यमसनस्टीव्ह स्मिथकॅझलीज स्टेडियम, केर्न्सऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २५ धावांनी

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ न्यू झीलंडच्या एकदिवसीय संघात हॉज क्रिकइन्फो
  2. ^ फ्लेमिंगच्या शस्त्रक्रियेमुळे व्हेट्टरी न्यू झीलंडचा कर्णधार क्रिकइन्फो
  1. ^ "आकडेवारी / स्टॅट्सगुरु / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय / फलंदाजीतील नोंदी – चॅपेल-हॅडली चषक" (इंग्रजी भाषेत). २१ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "आकडेवारी / स्टॅट्सगुरु / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय / गोलंदाजीतील नोंदी – चॅपेल-हॅडली चषक" (इंग्रजी भाषेत). २१ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  3. ^ "न्यू झीलंड वि ऑस्ट्रेलिया" (इंग्रजी भाषेत). २२ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  4. ^ "चॅपेल-हॅडली चषक नोंदी". इएसपीएन क्रिकइन्फो.
  5. ^ "सांख्यिकी / स्टॅट्सगुरु / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय / एकूण/सर्व नोंदी – चॅपेल-हॅडली चषक, २००७/०८" (इंग्रजी भाषेत). २२ नोव्हेंबर २०१० रोजी पाहिले.
  6. ^ "सांख्यिकी / स्टॅट्सगुरु / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय / एकूण/सर्व नोंदी – चॅपेल-हॅडली चषक" (इंग्रजी भाषेत). २२ नोव्हेंबर २०१० रोजी पाहिले.
  7. ^ "चॅपेल-हॅडली चषक नोंदी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  8. ^ "ट्वेंटी२० मालिका जाहीर, अंतिम सामन्याचे यजमानपद न्यू झीलंडकडे". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). 2016-12-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  9. ^ न्यू झीलंडचा विक्रमधी पाठलाग, बीबीसी स्पोर्ट, ८ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  10. ^ "आकडेवारी/ स्टॅट्सगुरु / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने / संघ नोंदी". क्रिकइन्फो. ८ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  11. ^ ऑस्ट्रेलिया स्लम टू १० विकेट डीफीट इएसपीएन क्रिकसन्फो, ८ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  12. ^ दक्षिण आफ्रिकेला पहिले स्थान इएसपीएन क्रिकसन्फो, ८ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  13. ^ a b स्टनिंग मॅकमिलन सील्स व्हाईटवॉश इएसपीएन क्रिकसन्फो, ८ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  14. ^ a b http://www.espncricinfo.com/icc_cricket_worldcup2011/content/story/502553.html

बाह्य दुवे