Jump to content

चुलबंद नदी

चुलबंद नदी
चुलबंद नदी
पाणलोट क्षेत्रामधील देशभंडारा जिल्हा, महाराष्ट्र

चुलबंद नदी ही महाराष्ट्रातील भंडारा व गोंदिया जिल्ह्यातून वाहते.अनेक लहान ओढ्यांचे पाणी या नदीला जाऊन मिळते. भंडारा जिल्ह्यासह, गोंदियाचंद्रपूर जिल्ह्यात या नदीचे पाणलोट क्षेत्र आहे.[] चुलबंद नदी ही गोदावरी नदीच्या उपनद्यांपैकी एक आहे.[] नदीवर असलेले धरण चुलबंद धरण नदीच्या आजूबाजूच्या भागांना पाणीपुरवठा करण्यासाठी चुलबंद नदीच्या पलीकडे बांधण्यात आले आहे. चुलबंद नदीमुळे लाखनी तालुक्यासह साकोलीलाखांदूर तालुक्यांची सीमा निर्धारित होते. या नदी पात्रात मिरेगाव, सोनमाळा, भूगाव, पळसगाव, विहीरगाव, नरव्हा, पाथरी, मरेगाव, लवारी ,उमरी,वडद, गिरोला/जपानी येथे वाळूघाट आहेत.[] गोंदिया तालुक्यातील राका पळसगाव येथे चुलबंध नदीवर कोल्हापूरी बंधाऱ्याचे सुमारे २० वर्षांपूर्वी बांधकाम करण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्यात साकोली तालुक्यात कुंभली येथे निम्न चुलबंद प्रकल्प बांधलेले आहे. धरणाचा लाभ आसपासच्या गावांना मिळतो.त्या धरणाला दुर्गाबाई डोह असे सुद्धा म्हणतात. []