चीन शत्रु विनाशिनी स्तोत्र
चीन शत्रु विनाशिनी हे स्तोत्र १९६२ भारत-चीन युद्धाच्यावेळी लिहिले गेले असून यामध्ये चीनला हरवण्यासाठी साक्षात् चंडिकेकडे प्रार्थना केलेली आहे. या स्तोत्राचे अनावरण सिंधी साहित्य सभेद्वारा जयहिंद कॉलेजचे प्रा.राम पंजवाणी यांनी सिंधी भाषेच्या वीर-रस काव्य संमेलनामध्ये केले. तसेच यापूर्वी या स्तोत्राचा काही अंश संस्कृत भाषेतील "भारत-वाणी" (अंक क्र.२१) या पाक्षिकात शके १८८४ म्हणजेच सन १९६२ साली प्रकाशित झाला होता. यानंतर काही भाग नागपूरच्या संस्कृत भाषा प्रचारिणी सभा या संस्थेच्या "संस्कृत भवितव्य" या साप्ताहिकामध्येही प्रकाशित झाला.या साप्ताहिकाच्या १००० प्रती काढण्यात आल्या होत्या. असे असले तरी त्यावर "अमूल्य" असे लिहले आहे.अमूल्य असे लिहिण्याचे एक कारण असेही होते की सदर स्तोत्राच्या प्रती त्यांनी विक्री न करता वाटल्या होत्या.तसेच याची मागवून घेण्याचीही सोय होती .
साधारणत: स्तोत्र या साहित्यप्रकारात एखाद्या देवतेची स्तुती करून त्या देवतेस प्रार्थना करून तिच्याकडून अमुक प्राप्ती होवो तमुक प्राप्ती होवो असे सांगितलेले असते; पण हे स्तोत्रच वेगळ्या धाटणीचे[ स्पष्टिकरण हवे]
असून अशा विषयावरही स्तोत्र होऊ शकते ही कल्पनाच मुळी नवी आहे. ऋग्वेदामध्ये भेरी सूक्त अशाच प्रकारचे आहे.या भेरी सूक्ततामध्ये दाशराज्ञ युद्धाच्या सुरुवातींस वीरश्री संचारण्यासाठी ते म्हणले गेले आहे. या स्तोत्रातही असेच वर्णन केले गेलेले आहे.'ज्या चीनने हिंदी-चीनी भाई भाई असे म्हणून पाठीवर प्रहार केला आणि साम्यवादाच्या सिद्धान्ताला काळिमा फासला,त्या चिन्यांच्या नाशासाठी भगवत्चंडिकेस मागणे मागतो की या चिन्यांचा युद्धात पराभव करून आम्हास विजय प्राप्त होवो!
संदर्भ नाही .[ संदर्भ हवा ] संदर्भ - साचा:ऋग्वेदाचे मराठी भाषांतर साचा:सिद्धेश्वर शास्त्री चित्राव